पंचायत समितीच्या आवारात 'घरकुल प्रतिकृती'चे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:38+5:302021-03-05T04:14:38+5:30
नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पं. स. सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते घरकुल प्रतिकृतीचे भूमिपूजन ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पं. स. सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते घरकुल प्रतिकृतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते यशवंत गवळी, पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, पंचायत समिती सदस्य जगन साबळे, लाला जाधव, तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकासधिकारी डी. एम. बहिरम, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन आंबडकर आदीसह मान्यवर उपस्थित होते.
--------------------
घरकुल कसे बनवावे, कसे असावे, याबाबत हा घरकुलाचा डेमो पंचायत समितीच्या आवारात बांधण्यात येणार असल्यामुळे कळवण या आदिवासी तालुक्यातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी हे घरकुल खुले ठेवण्यात येणार आहे. सर्वांसाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणांतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करणे यासाठी राज्यामध्ये 'महाआवास अभियान' राबविण्यात येत आहे. यावेळी अतुल देवरे, शिवाजी चौरे, शांताराम सदगीर, राजेश गवळी , शाखा अभियंता के. आर. चव्हाण, अमित मुठे, हर्षल सोनवणे, दीपक खांडेकर आदी होते.
--------------------
कळवण पंचायत समितीच्या आवारात 'घरकुल प्रतिकृती'चे भूमिपूजनप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती मनीषा पवार. समवेत जयश्री पवार, यशवंत गवळी, विजय शिरसाठ, जगन साबळे, लाला जाधव, बी. ए. कापसे, डी. एम. बहिरम, नितीन आंबडकर आदी. (०४ कळवण)
===Photopath===
040321\04nsk_12_04032021_13.jpg
===Caption===
०४ कळवण