अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन येवल्यात गुढ्या उभारून लाडू वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 04:02 PM2020-08-05T16:02:26+5:302020-08-05T16:03:45+5:30
येवला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विविध राममंदिरांमध्ये नित्यपूजेसह विविध कार्यक्र म साजरे करण्यात आले. अनेक ठिकाणी भगवे ध्वज लावून गुढ्याही उभारल्या गेल्या. पताकांसह विद्युत रोषणाई व सजावट तसेच फटाक्यांची आतषबाजी करत काही ठिकाणी लाडू वाटप केल्या गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहरातील बंड्याराम, काळाराम व वनवासी राम मंदिरात सजावटीसह मंदिरावर विद्युत रोषणाई केल्या गेली होती. शहरात चौकाचौकात भगवेध्वज उभारले गेले तर आयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन कार्यक्र म झाल्यानंतर शहरातही ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला गेला. वनवासी राममंदिरात गंगादरवाजा मित्र मंडळाच्यावतीने नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांचे हस्ते लाडू वाटप केल्या गेले. शहरात त्रिमुर्ती फ्रेंडस सर्कल व टक्कर गणेश मंडळांच्या वतीनेही लाडू वाटप करण्यात आले.