निऱ्हाळेत इमारतीचे भूमिपूजन
By admin | Published: October 16, 2016 01:04 AM2016-10-16T01:04:07+5:302016-10-16T01:07:30+5:30
साळवे यांचे दातृत्व : शाळेला नव्हती स्वमालकीची इमारत
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता प्रकृती अस्वास्थ्यामुळे २२ जुलैपासून रुग्णालयात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत राज्य सरकारचं काम अनोख्या पद्धतीने सुरू आहे. सचिवालयात सुरू असलेल्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री जयललिता यांची कमतरता भासू नये यासाठी त्यांचा फोटो समोर ठेवण्यात येत आहे.
जयललिता यांच्या अनुपस्थितीतही राज्याचा कारभार त्यांच्या डोळ्यांसमोर चालू आहे, असे भासविण्यासाठी ही सगळी कसरत केली जात आहे. राज्य सरकारच्या माहिती विभागाकडून बैठकांसाठी जयललिता यांचे छायाचित्र जारी करण्यात आले आहे. आपण सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने घतले आहेत, असे लिहिण्यात येत आहे.
जयललिता आजारी असल्याने त्यांच्याकडील सर्व खाती ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
त्यांच्या आजारपणामुळे दोन जणांनी आत्महत्या केल्या आहेत. े. जयललिता यांच्याविषयी अनुदार उद्गार काढल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एक बँक कर्मचारी आणि सराफा व्यवहारातील एकाला अटक केली आहे. (वृत्तसंस्था)