वडनेरभैरवला विकासकामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:18 AM2021-08-14T04:18:39+5:302021-08-14T04:18:39+5:30
वडनेरभैरव येथील दलितवस्तीमध्ये उघड्या गटारीमुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याने सरपंच सुनील पाचोरकर, उपसरपंच योगेश साळुंके आदी सदस्यांनी समाज ...
वडनेरभैरव येथील दलितवस्तीमध्ये उघड्या गटारीमुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याने सरपंच सुनील पाचोरकर, उपसरपंच योगेश साळुंके आदी सदस्यांनी समाज कल्याण विभागाकडे भूमिगत गटारीसह कॉंक्रीट रस्ते करण्याचे प्रस्ताव पाठवले होते. या प्रस्तावास मान्यता देत ४९ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली. यात विभागाची नावे व त्यासाठी संभाव्य खर्च पुढीलप्रमाणे - आंबेडकरनगर भाग १ (६ लाख ९९ हजार ६० रुपये), राजवाडा गटार (४ लाख ९८ हजार पाचशे तीस रुपये), राजवाडा १ (३ लाख), आंबेडकरनगर भाग २ (४ लाख ९८ हजार २२७ रुपये), अण्णा भाऊ साठेनगर ते राजवाडा (६ लाख), कारवाडी रस्ता क्र. १ (८ लाख), कारवाडी रस्ता क्र.२ (४ लाख ९९ हजार),पंचशीलनगर रस्ता क्र. १ (१० लाख), पंचशीलनगर रस्ता क्र.२ (२ लाख २ हजार) असा ४९ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल माळी, सुरेश वक्ते, अरुण पवार, संगीता सगर, रत्ना माळी, सुनीता सलादे, मंगला देवरे, प्रतिभा खिराडकर, संजय पवार, अश्विनी डंबाळे, विजय शिरसाठ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो -१३ वडनेर १
वडनेरभैरव येथे समाज कल्याण योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन करताना संपतराव वक्ते, सरपंच सुनील पाचोरकर, उपसरपंच योगेश साळुंके, बापूसाहेब पाचोरकर, बाळासाहेब माळी, डॉ. सुनील आहेर, कैलास पूरकर आदींसह ग्रामपालिका सदस्य व ग्रामस्थ.
130821\13nsk_33_13082021_13.jpg
वडनेरभैरव येथे समाज कल्याण योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन करताना संपतराव वक्ते, सरपंच सुनील पाचोरकर,उपसरपंच योगेश साळूके, बापूसाहेब पाचोरकर,बाळासाहेब माळी,डॉ सुनील आहेर, कैलास पुरकर, ग्रामपालिका सदस्य व ग्रामस्थ.