भुसावळ - इगतपुरी नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 11:53 PM2022-01-10T23:53:45+5:302022-01-10T23:55:11+5:30

मनमाड : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वेच्या भुसावळ - मुंबई रेल्वेमार्गावर सोमवारपासून (दि. १०) भुसावळ - इगतपुरी ही नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ झाला.

Bhusawal - Igatpuri New Memu Railway passenger train launched | भुसावळ - इगतपुरी नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ

भुसावळ - इगतपुरी नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देमनमाड रेल्वेस्थानकावर चालकांचे जोरदार स्वागत

मनमाड : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वेच्या भुसावळ - मुंबई रेल्वेमार्गावर सोमवारपासून (दि. १०) भुसावळ - इगतपुरी ही नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ झाला.
कोरोनासंबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करून झालेल्या या स्वागत कार्यक्रमामध्ये प्रथम भाजप शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी मेमू गाडीच्या सर्व चालकांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष स्वाती मुळे, शहर महिला मोर्चा शहराध्यक्ष सोनी पवार, नाजमा अन्सारी या महिला पदाधिकाऱ्यांनी सर्व चालकांना भारतीय पद्धतीने औक्षण केले, तर नितीन पांडे यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला.

शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी, जलील अन्सारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर उपस्थितांना मिठाईचे वाटत करण्यात आले. या स्वागत कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, कांतीलाल लुणावत, राजू पवार, नीलकंठ त्रिभुवन, एकनाथ बोडखे, संदीप नरवडे, बुधन शेख, आनंद बोथरा, अकबर शहा, गोविंद सानप, मकरंद कुलकर्णी आशिष चावरीया, धीरज भाबड, अविनाश भाबड तसेच मनमाड रेल्वेस्थानकाचे अधीक्षक यादव, मुख्य वाणिज्य निरीक्षक मीणा, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक शैलेंद्रसिंह ठाकूर, मुख्य पार्सल निरीक्षक विवेक भालेराव आदी रेल्वे प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Bhusawal - Igatpuri New Memu Railway passenger train launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.