रामनगर परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:51 PM2019-12-23T22:51:09+5:302019-12-23T22:51:49+5:30
रामनगर : निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असून, या परिसरात सातत्याने बिबट्या दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी ...
रामनगर : निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असून, या परिसरात सातत्याने बिबट्या दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.
प्रत्येक दिवशी अनेक शेतकऱ्यांना कधी उसाच्या फडात, तर कधी नदीच्या काठावर, गावकुसाला, झाडांच्या आडोशाला बिबट्या नजरेस पडत असल्याने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे परिसरातील गणेश टेकडी भागात पांडुरंग जामकर यांच्या गट नं. २६८ उसाच्या शेतामध्ये बिबट्या, मादी व दोन बछडे धनाजी जामकर, गणेश जामकर यांना दिसले होते.
परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारनियमनामुळे रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने शेतकºयांना रात्री विद्युतपंप सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते. अशावेळी रात्री-अपरात्री एकटा शेतकरी जीव मुठीत धरून काम करत आहे तर अनेक शेतकरी बिबट्याच्या भीतीने पिकांना पाणी देत नाही त्यामुळे पाणी असूनही पिके सुकू लागली आहे.