रवळजी परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 04:11 PM2019-09-23T16:11:16+5:302019-09-23T16:11:29+5:30
कळवण : तालुक्यातील मौजे रवळजी गावाच्या शिवारातील दरी भागात बिबट्याने दोन बकºया व एक बोकडाचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कळवण : तालुक्यातील मौजे रवळजी गावाच्या शिवारातील दरी भागात बिबट्याने दोन बकºया व एक बोकडाचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात दिवसा व रात्री शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशी अवस्था झाली आहे. वनविभागाने दरी परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. कळवण तालुका हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवरील तालुका असून गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात मोठी जंगल संपत्ती शासनाचा प्रयत्नाने राखली गेली आहे. या जंगलात सर्वच प्रकारचे प्राणी आढळून येतात. यात बिबट्यांची मोठी संख्या आहे. हे बिबटे सापुतारा , मंगलीदर, दोन मानूर या परिसरातून कळवण तालुक्यात येत असतात. त्यामुळे पुनंद खोर्यातील सर्वच भागात बिबट्यांची दहशत आहे. तालुक्यातील रवळजी गावाच्या दरी शिवारात कळवण वनविभाग व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने मोठे जंगल राखले गेले आहे. यामुळे येथे बिबट्यांचा नेहमीच वावर आढळला आहे. दि.२२ सप्टेंबरच्या मध्यरात्री शेतकरी दादाजी रामभाऊ पवार यांच्या गोठ्यातील दोन बकºया आणि एक बोकडाचा फडश्या पडला आहे. यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत वस्तीत राहणाºया नागरिकांना दिवसही घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. वनविभागाने दरी परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
---------------------------------
सध्या शेतीचा हंगाम सुरु असून मका, बाजरी, ऊस पिकेही वाढली आहेत. पिकांना खाद्य लावणे, पाणी देणे तर काही पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतात जावेच लागते. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणे कठीण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याची चर्चा झाल्याने शेतमजूरही कामावर येत नाही. मुलांना शाळेत पाठवणेही बंद केले आहे. त्यामुळे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा
-भास्कर भालेराव, रवळजी