मानूर परिसरात तीन दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:29 AM2019-12-09T00:29:39+5:302019-12-09T00:31:05+5:30

मानूर गावातील माळोदे वस्तीच्या परिसरात बिबट्या सलग मागील तीन दिवसांपासून दर्शन देत आहे. यामुळे येथील शेतकरी व शेतमजुरांनी वनविभाग नाशिक पश्चिम भागाकडे संपर्क साधला. वनविभागाने येथील ऊसक्षेत्राला लागून रविवारी (दि.८) पिंजरा लावला आहे.

Bibeta's stay in Manur area for three days | मानूर परिसरात तीन दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य

मानूर परिसरात तीन दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी घडले दर्शन : शेतमजुरांसह रहिवाशांना खबरदारीचे आवाहन; वनविभागाकडून पिंजरा तैनात

नाशिक : मानूर गावातील माळोदे वस्तीच्या परिसरात बिबट्या सलग मागील तीन दिवसांपासून दर्शन देत आहे. यामुळे येथील शेतकरी व शेतमजुरांनी वनविभाग नाशिक पश्चिम भागाकडे संपर्क साधला. वनविभागाने येथील ऊसक्षेत्राला लागून रविवारी (दि.८) पिंजरा लावला आहे.
औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या मौजे मानूर गावाच्या शिवारात छत्रपती शिवाजीनगर कॉलनीतील वस्तीलगत मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास बिबट्याने काही शेतमजुरांसह ऊसतोड कामगारांना दर्शन दिले. दरम्यान, सकाळी येथील रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत पिंजरा लावण्याची मागणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्याशी चर्चा करत तत्काळ वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे यांना पिंजरा लावण्याचे आदेश दिले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास वस्तीलगत असलेल्या ऊसशेतीच्या बांधाला पिंजरा तैनात करण्यात आला.
ऊसशेतीचे मोठे क्षेत्र, द्राक्षबागा तसेच जमिनीला समांतर असलेली व संरक्षक कठडे नसलेली पाण्याने भरलेली उघडी विहिर असल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता वनविभागाच्या सूत्रांनीदेखील वर्तविली आहे. येथील ऊसशेतीच्या आजूबाजूला बिबट्याच्या पाऊलखुणाही वनकर्मचाऱ्यांना आढळून आल्या. यामुळे बिबट्याचा वावर असल्याचे शिक्कामोर्तब झाले. हा बिबट्या उसातलाच असून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ५ वाजेच्या अगोदर ऊसशेतीच्या परिसरातून निघून जावे. तसेच पहाटेदेखील ऊसशेतीच्या आजूबाजूला फिरकू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. सूर्योेदय झाल्यानंतरच ऊसशेतीच्या जवळ जावे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना टाळण्यास मदत होईल, असे भदाणे म्हणाले.
परिसरात बिबट्याचे वास्तव्य असले तरी अद्याप बिबट्याने कोणत्याही व्यक्ती अथवा जनावरांवर हल्ला केला नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Bibeta's stay in Manur area for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.