केबीएच विद्यालयात ग्रंथदिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:35 PM2020-01-15T22:35:29+5:302020-01-16T00:33:39+5:30
मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जागर मराठीचा याअतंर्गत ह. भ. प. माधव महाराज शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीने आयोजन करण्यात आले होते.
पाटणे : मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जागर मराठीचा याअतंर्गत ह. भ. प. माधव महाराज शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीने आयोजन करण्यात आले होते.
स्वप्नील बच्छाव, अभिषेक शिरसाठ, दर्शन सावकार, लोकेश सावंत, सुबोध चव्हाण, हर्षल सोनवणे, अक्षय बच्छाव, भावेश निकम, हर्षल शर्मा, प्रतीक देवरे, धनंजय अहिरे, ओम पाटील, भावेश पगार, उदय अहिरे, गिरीश वैद्य, कौशल अहिरे, योगेश उशिरे आदी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले.
कार्यक्रमास एन. डी. शिरोळे, हेमंत देवरे, ए. यू. वाघ, शशिकांत पवार, जे. टी. ठाकरे, जी. यू. कोकरे, श्रीमती ए. जे. पगार, के. वाय. देवरे, व्यंकट मगर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर. डी. शेवाळे यांनी केले. आभार राजेश धनवट यांनी मानले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा प्राचार्य अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य सुनील बागुल, पर्यवेक्षक विलास पगार उपस्थित होते. प्राचार्य पवार, एन. डी. शिरोळे, ए. यू. वाघ, एस. टी. पवार, के. व्ही. खैरनार, एस. एस. ठाकरे, व्यंकट मगर, हेमंत देवरे, शशिकांत पवार, राजेश धनवट, राजेंद्र शेवाळे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व ग्रंथपूजन करण्यात आले.