दिंडोरीत सायकल वाटप

By admin | Published: February 16, 2017 10:57 PM2017-02-16T22:57:59+5:302017-02-16T23:03:35+5:30

दिंडोरीत सायकल वाटप

Bicycle Allocation In Dindori | दिंडोरीत सायकल वाटप

दिंडोरीत सायकल वाटप

Next

 दिंडोरी : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयता ८ वी ते १२वीच्या गरजू आणि ५ किमी अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात येते. या योजनेचा १०० टक्के फायदा दिंडोरी तालुक्याला दिला असून, याबरोबरच खेड्यातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी जास्त प्रमाणात बसही उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनेचा लाभार्थींनी योग्य उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी केले.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या २५ विद्यार्थिनींना मोफत सायकलींच्या वाटप कार्यक्र मप्रसंगी पाटील बोलत होते, ते पुढे म्हणाले की दिंडोरीसारख्या आदिवासी भागात दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल ही उपक्रमशील शाळा असून, शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून प्राचार्य सी. बी. पवार यांचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, संशोधन सहायक अधिकारी कुलकर्णी, दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. घोलप, विस्तार अधिकारी डी. डी. देवरे, प्राचार्य सी. बी. पवार, पर्यवेक्षक श्रीमती के. डी. भामरे, उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्य सी. बी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कथार यांनी, तर आभार प्राचार्य सी.बी.पवार यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Bicycle Allocation In Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.