दुचाकी विक्री करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 06:11 PM2018-10-01T18:11:08+5:302018-10-01T18:12:07+5:30
बनावट कागदपत्रे बनवून चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या टोळीचा जायखेडा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, साक्र ी तालुक्यातील पिंपळनेर येथून चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार दुचाकी व बनावट कागदपत्र बनविण्याच्या साहित्यासह १ लाख १९ हजार रु पये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जायखेडा : बनावट कागदपत्रे बनवून चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या टोळीचा जायखेडा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, साक्र ी तालुक्यातील पिंपळनेर येथून चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार दुचाकी व बनावट कागदपत्र बनविण्याच्या साहित्यासह १ लाख १९ हजार रु पये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर दुचाकी चोरीचे मोठे रेकेट उघड होण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसात जायखेडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या मुल्हेर परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे नागरिकात पोलिसांविषयी नाराजी वाढली होती. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी मुल्हेरसह कार्यक्षेतातील ठिकठिकाणी नाका बंदी करून वाहनांची तपासणी सुरु केली होती. या तपासणी अंतर्गत काही संशयित दुचाकींना ताब्यात घेण्यात आले होते. या आधारे पोलिसांनी आपली तपासचक्र े वेगाने फिरून पिंपळनेर येथे चोरीच्या दुचाकी चेसीस नंबर बदलून व बनावट कागदपत्र तयार करून पाच ते दहा हजार रु पयात विकल्या जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक ए.जि. मोरे, सा.पो.उप निरीक्षक गोविंद सोनावणे, पो.ह. नितीन पवार, अंबादास थैल, निकेश कोळी, बोडके, राजू गायकवाड, निंबा खैरनार, देविदास माळी यांनी सापळा रचून, दानील रामजी कुवर घोडेमाळ पिंपळनेर, रमेश उर्फ गुद्द्या बाबूलाल साळुंके रा. इंदिरानगर पिंपळनेर, मयूर उर्फ लकी जगन्नाथ बर्डे रा. चिकसे, सुरेश वामन पवार रा.नवापाडा, यांना पिंपळनेर येथील घोड्यामाळ परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्या कडून होंडा कंपनीची शाईन एम.एच.४१ ए.डी. २४१०, एम.एच.४१ डब्ल्यू ४२१९, बजाज प्ल्याटीना एम.एच.१५ एफ.के.५४३६क, हिरोहोंडा स्प्लेंडर एम.एच.१५ सी.एन.८९७८, सह १ लाख १९ हजार रु पये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.