दुचाकीचालकांची पोलीस कर्मचाºयांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:32 AM2017-10-16T00:32:47+5:302017-10-16T00:32:53+5:30

Bicycle operators beat up police personnel | दुचाकीचालकांची पोलीस कर्मचाºयांना मारहाण

दुचाकीचालकांची पोलीस कर्मचाºयांना मारहाण

Next

नाशिक : सिग्नल तोडल्याने दुचाकी वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केल्याचा, तर दुसºया घटनेत एकेरी मार्गावरून जात असल्याने थांबविल्याचा राग आलेल्या दुचाकीस्वाराने एका पोलीस कर्मचाºयास मारहाण व धक्काबुक्की तर दुसºयाच्या अंगावर दुचाकी घातल्याची घटना मुंबई नाका व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी (दि़१४) घडली़
शहर वाहतूक शाखेच्या युनिट चारमधील पोलीस शिपाई नंदू गवळी हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास फेम ट्रॅफिक सिग्नलवर कर्तव्यावर होते़ यावेळी पुणे-नाशिकरोडने ड्रीय युगा दुचाकीवर (एमएच १५, ईसी ८६६५) आलेल्या संशयित विकास सुभाष हुळहुळे (३०, रा़वडगाव पिंगळा, ता़सिन्नर, जि़नाशिक) याने सिग्नल तोडला़ यामुळे पोलीस कर्मचारी गवळी यांनी सिग्नल तोडल्याबाबत तसेच वाहनांची कागदपत्रांची मागणी केली असता संशयित हुळहुळे व त्याच्या साथीदाराने शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले़ याप्रकरणी गवळी यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यतिन पवार हे शनिवारी (दि़१४) सायंकाळच्या सुमारास शालिमारच्या देवीमंदिराजवळ कर्तव्यावर होते़ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास यामाहा दुचाकीवरून (एमएच १५, एफजे ६४२५) आलेले संशयित नीलेश पाटील (३१, श्रीकला अपार्टमेंट, एकता कॉलनी, इंदिरानगर) हे एकेरी मार्गावरून जात असल्याने पवार यांनी दुचाकी थांबविण्यास सांगितले़ यावेळी पाटील यांनी आपली दुचाकी पवार यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याने दुचाकीचे पुढील चाक पायावरून गेले़ याप्रकरणी पवार यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Bicycle operators beat up police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.