सायकल तरी कोठे परवडते?; इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:47 PM2022-02-07T12:47:53+5:302022-02-07T12:56:16+5:30

नाशिक : इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गत वर्षभरात पेट्रोल, डिझेलचे दर जवळपास २५ ...

bicycle Price increase public suffers from rising prices of everything, including fuel | सायकल तरी कोठे परवडते?; इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त

सायकल तरी कोठे परवडते?; इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त

Next

नाशिक : इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गत वर्षभरात पेट्रोल, डिझेलचे दर जवळपास २५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे वाहने सोडून चक्क सायकल वापरण्याची वेळ सामान्यांवर आली आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे अनेकजण सीएनजी आणि इलेक्ट्रिकल वाहनांना पसंती देत आहेत. मात्र, किंमती वाढल्याने आता सायकलही परवाडेनाशी झाली आहे. गत वर्षभरात सायकलच्या किमतीत पंधरा टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे, त्यामुळे साधी सायकल घ्यायची म्हटलं तरी सद्य:स्थिती किमान सात हजार रुपये मोजावे लागत आहे.

कोणती सायकल कितीला?

नाशकात सात हजारांपासून ते अगदी पाच लाखांपर्यंत सायकल उपलब्ध आहेत. कंपनी आणि सायकलच्या मॉडेलनुसार त्यांची किंमत कमी-अधिक असते.

साधी सायकल : ७०००

फॅन्सी सायकल : १५०००

गिअर सायकल : १२,५००

इलेक्ट्रिक सायकल : ३००००

हायब्रीड सायकल : १००००

का वाढल्या किमती?

इंधन दरवाढ आणि कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे गत वर्षभरात सर्वच प्रकारच्या सायकलींच्या किमती पंधरा ते पंचवीस टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याचे महत्त्व उमगलेले आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून सायकलला विशेष पसंती मिळत आहे. ई-सायकलसाठी लागणाऱ्या लिथियम आयर्न बॅटरीच्या किमती वाढल्याने सायकलचे दरदेखील वाढले आहेत. लिथियम हे चीन, अमेरिका येथून आयात केले जाते.

इलेक्ट्रिक सायकलला मागणी

बाजारात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक सायकलला देखील ग्राहकांकडून मागणी मिळत आहे. इलेक्ट्रिक सायकलमध्येदेखील गिअर आणि नॉन गिअर या दोन्ही प्रकारात सायकल उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक नॉनगिअरची सायकल पंचवीस ते तीस हजारांदरम्यान असून, गिअरच्या सायकलची किंमत तीस हजार रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.

नाशिकमध्ये सायकलप्रेमींची संख्या अधिक आहे. त्यामुळे गिअरच्या सायकललीबरोबरच इलेक्ट्रिक सायकललादेखील आता पसंती मिळत आहे. कोरोनाकाळात सायकलच्या मागणीवर परिणाम झाला असला तरी आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

- आकाश चौधरी, सायकल विक्रेते

 

Web Title: bicycle Price increase public suffers from rising prices of everything, including fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.