शहरात दुचाकीचोरीचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:16 AM2019-03-16T00:16:11+5:302019-03-16T00:30:29+5:30
शहराच्या विविध भागांतून पाच मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठण्याच्या हद्दीतून एक, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, मुंबईनाका एक व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण पाच दुचाकी वेगवेगळ्या दिवशी चोरीला गेल्या
नाशिक : शहराच्या विविध भागांतून पाच मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठण्याच्या हद्दीतून एक, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, मुंबईनाका एक व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण पाच दुचाकी वेगवेगळ्या दिवशी चोरीला गेल्या असून, गुरुवारी (दि.१४) याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट वाढला असून, चोरट्यांनी पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे. पंचवटीतील पेठफाटा परिसरातील म्हाडा इमारतीच्या पार्किंगमधून बुधवारी (दि.१३) ९.३० वाजेपासून ते गुरुवारी ७ वाजेपर्यंतच्या काळात अंदाजे १४ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी क्रमांक एमएच १५ सीयू १३१९ चोरीला गेली. याप्रकरणी दिलीप पुंडलीक चौधरी यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्याच चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये घडली, येथून एमएच १५ डीए २५७६ क्रमांकाची काळ्या रंगाची दुचाकीचोरीला गेल्याची फिर्याद कुणाल चंद्रकांत उबाळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना अशोकामार्ग परिसरात स्वरा डेंटल क्लिनिकजवळ घडली.
येथे सोमवारी (दि.११) सायंकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६.१५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी एमएच १५ जीक्यू ०४१६ क्रमांकाची ६० हजार रुपये किमतीची मोपेड दुचारी चोरून नेली. याप्रकरणी योगेश अंबादास शेलार यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर अंबड परिसरात दोन दुचाकीचोरीला गेल्या असून, मंगळवारी (दि.१२) मोरवाडीतील दत्तमंदिराजवळून एमएच १५ एएल ४३३७ क्रमांक ाची व दहा हजार रुपये किमतीची दुचाकीचोरीला गेली. याप्रकरणी सुनील तुकाराम कातकाडे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्रिमूर्ती चौक परिसरात घटना
सिडकोच्या त्रिमूर्ती चौक परिसरातील दुर्गामाता मंदिरामागील बाजूस घडली. येथे एमएच १५ ईयू १९९१ क्रमांकाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी उभी असताना अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी सुरज शिवदास शिरसाठ यांनी फिर्याद दिली असून, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.