सूतगिरणीच्या जमिनीसाठी अडीच कोटींची बोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:15 AM2018-09-09T00:15:10+5:302018-09-09T00:17:56+5:30
लोहोणेर : कसमादे पट्ट्यासह संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या अवसायनातील नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणीची बागाईत क्षेत्र असलेली सुमारे २० एकर जमीन कोर्ट कारवाई करीत एकतर्फी लिलावात केवळ ९५ लाख रुपयांना विकण्यात आली; मात्र या जमिनीच्या फेरविक्रीबाबत मालेगाव येथील दिवाणी न्यायालयात सूतगिरणी कामगारांच्या संघटनेने आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने नवीन निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार नवीन इच्छुक खरेदीदारांनी ही जमीन २ कोटी ,५० लाख रुपयांपेक्षा जादा भावाने घेण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे, अशी माहिती दिनकर जाधव यांनी दिली़

शुक्रवारी (दि. ७) मालेगाव येथील दिवाणी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. दि. ३१ आॅगस्ट रोजी न्यायालयाने या जमिनीच्या फेरविक्रीसाठी इच्छुकांना आॅफर देण्याचे आवाहन कोर्टात केले होते. त्यास सोशल मीडिया व वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळाल्याने अनेक शेतकरी व जमीन व्यावसायिकांनी न्यायालयात उपस्थित राहून किमान किमतीची आॅफर देऊन जाहीर लिलावाची मागणी केली आहे. दि. ७ सप्टेंबर रोजी मालेगाव येथील दिवाणी न्यायालय आवारात सदर जमिनीच्या खरेदीत भाग घेत इच्छुक खरेदीदार शेतकरी व व्यावसायिकांनी प्रतिज्ञापत्रच सादर केले. त्यात प्रामुख्याने प्रसिद्ध व्यावसायिक प्रल्हाद दगाजी सोनवणे, सुनील आहेर, अनिल तोरणे, योगेश पाटील, शिवाजी पंडितराव सोनवणे, भाऊसाहेब पगार, नंदलाल काशीनाथ निकम, मनोज आहिरे आदी शेतकऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात २ कोटी पन्नास लाख रुपयांपर्यत लेखी आॅफर देऊन जाहीर लिलावाची बोली लावणेबाबत विनंती केली. ठेंगोडा सूतगिरणीकडे येथील कामगारांचे ५ कोटी रु पयांपेक्षा जादा घेणे आहे.