नांदूरमधमेश्वर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:29 PM2019-03-22T12:29:41+5:302019-03-22T12:30:16+5:30
सायखेडा : नांदूरमधमेश्वर भागातील इकडे वस्ती असलेल्या परिसरात कालव्या लगत असलेल्या विहिरीत गुरु वारी मध्यरात्री पडलेल्या बिबट्याला शुक्रवारी सकाळी बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले.
सायखेडा : नांदूरमधमेश्वर भागातील इकडे वस्ती असलेल्या परिसरात कालव्या लगत असलेल्या विहिरीत गुरु वारी मध्यरात्री पडलेल्या बिबट्याला शुक्रवारी सकाळी बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले. नांदूरमध्यमेश्वर येथे कालव्याच्या लगत असलेल्या नामदेव देवराम नाईकवाडे व राजेंद्र पंढरीनाथ नाईकवाडे यांच्या गट नंबर ३९१ क्षेत्रातील सामाईक विहिरीत गुरु वारी मध्यरात्रीच्या सुमारास भक्षाचा पाटलग करत असतांना अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने बिबटया विहिरीत पडला. पहाटे चार वाजेच्या सुमारास , कुत्र्यांचा भुकण्याचा आवाज आणि बिबट्याच्या डरकाळीच्या आवाजाने जवळच असलेल्या नामदेव नाईकवाडे यांना जाग आली. अंधार असल्याने बॅटरीच्या उजेडात आजूबाजूला पाहिले असता काहीही दिसले नाही मात्र आवाजाचा कानोसा घेतला असता आवाज विहिरीतून येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबटया विहिरीतील पंपला जोडलेल्या पाईपचा आधार घेऊन बिबटया पाण्यावर दिसला. त्यांनी गावातील पोलीस पाटील यांना कळविले सकाळी सहा वाजेच्या दरम्यान वनविभागाचे अधिकारी संजय भंडारी हे टीम घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पिंजरा सोडून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्याच्या साहाय्याने बाहेर काढण्यास यश आले. पिंजर्यातील बंदीस्त बिबट्याला नर्सरीत नेण्यात आले. यावेळी टेकनर, शेख यांच्यासह कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.