बेघरांना चार भींतीत ठेवण्याचे यंत्रणेपुढील मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:01 PM2020-03-28T15:01:47+5:302020-03-28T15:05:57+5:30

शनिवारी (दि.२८) गोदाकाठावर सर्रासपणे फिरणा-या काही बेघरांना संत गाडगे महाराज धर्मशाळेत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी वाहनांमधून रवाना केले; मात्र काही वेळेतच सर्व बेघर पुन्हा गोदाकाठावर

The big challenge in front of the homelessness scare system | बेघरांना चार भींतीत ठेवण्याचे यंत्रणेपुढील मोठे आव्हान

बेघरांना चार भींतीत ठेवण्याचे यंत्रणेपुढील मोठे आव्हान

googlenewsNext
ठळक मुद्देबेघर, निराश्रितांचे काय? ही मंडळी अजूनही उघड्यावरच मनपा शाळांच्या इमारतींचा व्हावा वापर

नाशिक : कोरोनाचा प्रसार शहरासह जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस, मनपा प्रशासनदेखील युध्दपातळीवर सतर्कता घेत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत, मात्र शहरातील बेघर, निराश्रित मात्र अद्यापही उघड्यावरच असून त्यांनी ‘निवारा’ शोधायचा कोठे अन् कसा हा यक्षप्रश्न कायम आहे.
कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये, म्हणून नागरिकांनी घरांमध्येच थांबावे, असे आवाहन केले जात आहेत. जे विनाकारण घरातून बाहेर पडत आहेत, त्यांच्यावर दंडुकाही उगारला जात आहे, अन् ते स्वभाविकही आहे; मात्र ज्या नागरिकांचे कोणतेही घर नाही, जे वर्षानुवर्षांपासूनच गोदामाईच्या कुशीत दिवस-रात्र काढत आले, अशा बेघर, निराश्रितांचे काय? ही मंडळी अजूनही उघड्यावरच वास्तव्यास आहे. कोरोनाचा धोका यामुळे अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. निराश्रितांच्या आरोग्याचीही खूप काही चांगली अवस्था नसते. महापालिकेचे निवारागृहदेखील कुलूपबंद अवस्थेत आहेत. त्यामुळे निराश्रीतांनी जायचे कोठे अन् कोरोनापासून खबरदारी घ्यायची कशी? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह वैद्यकिय सेवा देणाऱ्या यंत्रणांनी आता गोदाघाट परिसरात सर्रासपणे वावरणाºया बेघरांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे अन्यथा कोरोनाची पहिली शिकार बेघरांपैकी एखादी व्यक्ती ठरू शकते,असेही बोलले जात आहे.
शनिवारी (दि.२८) गोदाकाठावर सर्रासपणे फिरणा-या काही बेघरांना संत गाडगे महाराज धर्मशाळेत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी वाहनांमधून रवाना केले; मात्र काही वेळेतच सर्व बेघर पुन्हा गोदाकाठावर परतले. बेघरांना चार भींतीत ठेवण्याचे मोठे आव्हान शासकिय यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूने बेघर व्यक्तींना जर संक्रमित केले तर मोठा अनर्थ होऊ शकतो, कारण बेघर हे सर्रासपणे शहरांमधील गल्लीबोळात भटकंती क रत असतात. त्यामुळे या बेघरांना चार भिंतींच्या आत ठेवून त्यांना वेळोवेळी अन्नपाणी पुरविणे गरजेचे आहे. बेघर घरांमध्ये गेले तर कोरोनाचा प्रादूर्भावाची शक्यता अधिकाधिक कमी होईल, आणि नाशिक असेच अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

मनपा शाळांच्या इमारतींचा व्हावा वापर
शाळांना बेमुदत सुटी जाहीर असून महापालिका शाळांच्या इमारतीसुध्दा ओस पडल्या आहेत. शहर व परिसरात फिरणाºया बेघर, निराश्रितांना या शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये आश्रय दिला जावा, अशी मागणी होत आहे. मनपा शाळांच्या इमारतींचा वापर बेघरांच्या तात्पुरत्या निवाºयासाठी करण्यास हरकत नसून यासाठी प्रशाासनाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

Web Title: The big challenge in front of the homelessness scare system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.