काढणीसाठी आलेल्या कांद्यावर मोठे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 11:58 PM2020-12-12T23:58:59+5:302020-12-13T01:44:26+5:30
राजापूर : परिसरात लाल कांदा काढणीस सुरुवात झाली आहे; परंतु दोन दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे कांदा काढणी केलेल्या व शेतात असलेल्या कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
राजापूर : परिसरात लाल कांदा काढणीस सुरुवात झाली आहे; परंतु दोन दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे कांदा काढणी केलेल्या व शेतात असलेल्या कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
सध्या थंडी मोठ्या प्रमाणावर असल्याने काढून ठेवलेला कांदा कापणीसाठी मजुरांना थंडीमुळे मजूर मिळणे अवघड झाले आहे. कांदा कापणीसाठी अव्वाच्या सव्वा रोज देऊन कांदा कापणी करावी लागत आहे. ढगाळ हवामान व थोड्याफार प्रमाणात बारीक भुरभुर पाऊस येत असल्याने शेतकऱी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.
राजापूर व परिसरात लाल कांदा यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. रांगडा कांदा हा राजापूर येथे निघणार नाही. राजापूर येथील विहिरीने आताच तळ गाठला आहे. त्यामुळे निसर्गाने व शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या या अपेक्षेवर पाणी फिरणार आहे. राजापूर परिसरात अजून एक महिन्याने पाणी टंचाईची समस्या जाणवणार आहे. राजापूर येथे रांगडा उन्हाळ कांदा हा फक्त ज्या शेतकऱ्यांनी शेततळे भरून ठेवलेले आहे अशा शेतकऱ्यांची रांगडा व उन्हाळ कांदा लागवड सुरू आहे.
आम्ही खरिपाचा लाल कांदा काढणीस सुरुवात केली. कांदा काढणीस उशीर झाला तर कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी कांदा काढून कापून पोळीत टाकला जात आहे. थंडीमध्ये कांदा कापणी करावी लागते आहे. शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. शासनाने कांदा निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, पाहिजे ही आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
- विठ्ठल वाघ, शेतकरी, राजापूर. (१२ कांदा)