बडी दर्गा : हुसेनी बाबा यांच्या उरूसाला उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 02:05 PM2019-06-13T14:05:52+5:302019-06-13T14:09:36+5:30

सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारा दिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे.

Big Durga: Hussaini Baba begins his journey with Ursa | बडी दर्गा : हुसेनी बाबा यांच्या उरूसाला उत्साहात प्रारंभ

बडी दर्गा : हुसेनी बाबा यांच्या उरूसाला उत्साहात प्रारंभ

Next
ठळक मुद्देकापडी चादरवरील अनावश्यक खर्च भाविकांना टाळावाभद्रकाली पोलिसांकडून चादर अर्पण

नाशिक : सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारा दिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे. यावर्षी उन्हाळी सुटीत निवडणूका, रमजान पर्व आल्यामुळे बडी दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून उरूस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जुन्या नाशिकमधील पिंजारघाट येथील हुसेनी बाबा यांच्या बडी दर्ग्याच्या परिसरात सायंकाळी उरूस भरत आहेत. यात्रेत सहभागी होताना भाविकांनी कापडी चादरऐवजी फुलांच्या चादरी मजारशरीफवर अर्पण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन विश्वस्तांकडून करण्यात आले आहे. कापडी चादरवरील अनावश्यक खर्च भाविकांना टाळावा, त्याऐवजी गोरगरीबांना मदतीचा हात द्यावा, हा यामागील उद्देश्य असल्याने विश्वस्तांनी सांगितले.
बडी दर्गा उरूस हा दरवर्षाचे भाविकांचे तसेच बाळगोपाळांचे आकर्षण असते. उरूसमध्ये मिळणारा ‘फालुदा’ हे शितपेय लोकप्रिय आहे. नाशिकसह मुंबईहून फालुदाविक्रेते यात्रेत दुकाने थाटतात. तसेच जुने नाशिक भागातील एकमेव जुनी यात्रा म्हणूनही यात्रेची ओळख आहे. हिंदू-मुस्लीम भाविक मोठ्या उत्साहात बडी दर्ग्याच्या यात्रेत हजेरी लावतात. यावर्षी दर्ग्याच्या आवारात सिमेंट कॉँक्रीट करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात गैरसोय कमी झाली आहे; मात्र दर्गा परिसराचे विकासकाम संथगतीने सुरू राहिल्याने यंदा अर्धवट स्थितीतील बांधकामाची अडचण यात्रेत जाणवत आहे.
जुने नाशिकसह शहर व परिसरातील मित्रमंडळांनी संदलच्या मिरवणूका ढोल-ताशांच्या गजरात बडी दर्गाच्या आवारात आणू नये. त्याऐवजी पारंपरिक पध्दतीने डोक्यावर चादर, प्रसादाचे ताट ठेवून दरूदोसलाम, नात-ए-रसूल, मनकबत चे पठण करत यावे. जेणेकरून कुठल्याहीप्रकारचा बेशिस्तपणा यात्रेत होणार नाही, असे विश्वस्तांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. यात्रोत्सवाची सांगता रविवारी (दि.२३) होणार आहे. परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भद्रकाली पोलिसांकडून चादर अर्पण
सालाबादप्रमाणे यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहिली चादर बडी दर्ग्यामधील मजारवर चढविण्याचा मान वर्षानुवर्षांपासून भद्रकाली पोलिसांना दिला जातो. यावर्षीही प्रथा पाळण्यात आली. पोलिसांकडून विधिवत डफलीच्या निनादाने मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकीत पारंपरिक पध्दतीने कव्वाली, नातचे पठण करण्यासाठी ‘मिलाद पार्टी’ला सहभागी करून घेण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.१२) सायंकाळी उपस्थित राहून बाबांच्या मजारवर चादर अर्पण केली.
---

Web Title: Big Durga: Hussaini Baba begins his journey with Ursa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.