नासाच्या मंगळ मोहिमेकडून मोठ्या अपेक्षा, अविनाश शिरोडे यांचे मत 

By संजय पाठक | Published: February 26, 2021 03:35 PM2021-02-26T15:35:51+5:302021-02-26T15:40:54+5:30

नाशिक- नासाने मंगळावर पाठवलेल्या रोव्हर यानाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. या मोहिमेत दगड आणि अन्य खनीजे आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संशोधनाला माठी चालना मिळणार आहे, त्यामुळे या मोहिमेकडून मोठी अपेक्षा असल्याचे मत नॅशनल स्पेस सोसायटीचे (युएसएची नाशिक शाखा)संचालक अविनाश शिरोडे यांनी व्यक्त केले.

Big expectations from NASA's Mars mission, says Avinash Shirode | नासाच्या मंगळ मोहिमेकडून मोठ्या अपेक्षा, अविनाश शिरोडे यांचे मत 

नासाच्या मंगळ मोहिमेकडून मोठ्या अपेक्षा, अविनाश शिरोडे यांचे मत 

Next
ठळक मुद्देदगड-खनिज आणणार संशोधनाला मोठा वाव 

नाशिक- नासाने मंगळावर पाठवलेल्या रोव्हर यानाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. या मोहिमेत दगड आणि अन्य खनीजे आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संशोधनाला माठी चालना मिळणार आहे, त्यामुळे या मोहिमेकडून मोठी अपेक्षा असल्याचे मत नॅशनल स्पेस सोसायटी युएसएचे संचालक अविनाश शिरोडे यांनी व्यक्त केले.

अवकाश क्षेत्रात नवनविन संशोधनाविषयी कुतूहल असते. तसेच मंगळाबाबत देखील आहेत, त्यावर सध्या नासाने पाठवलेल्या यानात गुप्त संदेश देखील पाठवला आहे, त्यामुळे अनेक चर्चा झडत आहेत. त्या संदर्भात अविनाश शिरोड यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- मंगळ यान मोहिमेविषयी सध्या खूपच चर्चा सुरू आहे. यंदाच्या मेाहिमेविषयी काय सांगाल?
शिरोडे- नासाच्याच नव्हे तर कोणत्याही अवकाश संशोधनाविषयी नेहेमीच उत्कंठा असते. मंगळवरील मोहिमेविषयी कुतूहल असण्याचे कारण म्हणजे तेथे जीवसृष्टी आहे काय, याविषयीचा शोध होय. यंदा ही मोहिम राबवताना जे रोव्हर मंगळावर पाठवण्यात आले आहे, ते दगड, खनीज देखील आणेल असे नियोजन आहे. त्यामुळे संशोधनाला चालना मिळेल.

प्रश्न- परग्रहावर आणि विशेषत: मंगळावर जीवसृष्टीबाबत चर्चा होतात, तसेच एलियन बाबत देखील सुरू असते..
शिरोडे- परग्रहावर जीवसृष्टी आणि एलीयन आहेत याबाबत नेहेमीच दावे प्रतिदावे केले जातात आणि त्यावरून रंजक चर्चाही घडतात. उडत्या तबकड्यांबाबत देखील अशीच चर्चा हेाते. मध्यंतरी इस्त्राईलच्या एका शास्त्रज्ञाने नासा आणि एलीयन्स संपर्काबाबत असेच दावे केले हेाते. मंगळावरील जीवसृष्टीविषयी देखील अशीच चर्चा असली तरी ठाम पणे कोणी काही सांगू शकत नाही.

प्रश्न- भारताच्या अवकाश संशोधनाची तयारीविषयी काय सांगाल?
शिरोडे- भारताला अवकाशात मानवाला पाठवायचे आहे, त्याची तयारी सध्या सुरू आहे. शिवाय चांद्र मोहिमेबाबत देखील तयारी सुरू आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारताच्या अवकाश मोहिमेतील यश खूप मोठे आहे.

Web Title: Big expectations from NASA's Mars mission, says Avinash Shirode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.