भाजपमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 01:13 AM2019-11-13T01:13:44+5:302019-11-13T01:14:02+5:30

विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरासह जिल्ह्यात यश मिळाले असले तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला.

 Big organizational change soon in BJP | भाजपमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल

भाजपमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरासह जिल्ह्यात यश मिळाले असले तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपने संघटनात्मक बदल करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रमच जाहीर करण्यात आला असून, शहर आणि जिल्हाध्यक्ष बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष बाळासाहेब पालवे हे तीन महिन्यांपूर्वीच निवडण्यात आले आहेत, तर जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांना मुदत संपूनही मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु आता संघटनात्मक निवडणुका सुरू होत असून,
१० डिसेंबरच्या आत नूतन शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार
आहे.
दि. १० ते २० नोव्हेंबर दरम्यान सदस्य नोंदणी होणार असून, २४ नोव्हेंबरपर्यंत सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. १५ ते २५ नोव्हेंबर दरम्यान बूथ अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडप्रक्रिया घेतल्या जातील. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत मंडल अध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात येतील आणि त्यानंतर १० डिसेंबरपर्यंत सर्व शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्षांची निवडप्रक्रिया पार पडेल. याच दरम्यान, प्रदेश प्रतिनिधींचीदेखील निवडप्रक्रिया पार पडणार आहे.
नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांत जिल्हाध्यक्ष बदलण्याची गरज पडली नाही, मात्र त्यानंतरदेखील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांना मुदतवाढ मिळाली. दुसरीकडे भाजपने तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडून मात्र पद काढून घेतले होते. त्यांच्या कामकाजाविषयी तक्रारी करण्यात आल्यानंतर निवडणुका समोर असतानाही सानप यांचे पंख छाटण्यात आले आणि गिरीश पालवे यांची वर्णी लावण्यात आली होती. दरम्यान, आता पालवेंना मुदतवाढ मिळेल किंवा नाही याविषयी साशंकता आहे. पक्षातील त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ सुनील केदार, उत्तमराव उगले, विजय साने, महेश हिरे यांच्यासह अन्य अनेकांची नावे चर्चेत आहेत.
ज्येष्ठांची शक्यता
राज्यात सत्ता असताना भाजपने संघटनात्मक दृष्टीने फारसे लक्ष दिले नसले तरी आता मात्र राज्यातील अवस्था बघून संघटनेकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून, त्यामुळेच पक्षातील ज्येष्ठांनाच या पदावर नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.

Web Title:  Big organizational change soon in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.