फुडपार्कसाठी मोठा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:05 AM2017-08-22T00:05:23+5:302017-08-22T00:38:50+5:30

विंचूरच्या वाइनपार्कजवळील फुडपार्कसाठी राखीव जागेसाठी यंदा मोठा प्रतिसाद लाभला असून, येथे अन्नप्रक्रिया उद्योग यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. आॅनलाइनपद्धतीने जे अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यावर लवकरच एलओसी निर्णय घेणार आहे.

 The big response for the foodpark | फुडपार्कसाठी मोठा प्रतिसाद

फुडपार्कसाठी मोठा प्रतिसाद

Next

नाशिक : विंचूरच्या वाइनपार्कजवळील फुडपार्कसाठी राखीव जागेसाठी यंदा मोठा प्रतिसाद लाभला असून, येथे अन्नप्रक्रिया उद्योग यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. आॅनलाइनपद्धतीने जे अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यावर लवकरच एलओसी निर्णय घेणार आहे. विंचूर येथील वाइनपार्कमधील रिक्त भूखंड लवकरच फुडपार्कसाठी देण्यात येणार आहेत, अशी घोेषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अलीकडेच केली आहे. मात्र, वाइनपार्कचे क्षेत्र वगळता अगोदरच फुडपार्कसाठी स्वतंत्र क्षेत्र ठेवले आहे. विंचूर येथे महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यातील १३३ हेक्टर क्षेत्रापैकी दोन टप्पे वाइन उद्योगांसाठी असून, तिसºया टप्प्यातील १९ हेक्टर क्षेत्रात चाळीस भूखंड हे अन्न उद्योग प्रक्रियासाठी राखीव आहेत. विंचूर येथे राज्यशासनाने जाणीवपूर्वक वाइनपार्क तयार करण्याचे प्रयत्न केले असले तरी ते व्यवहार्य ठरले नाही. त्यातच येथे वायनरींपेक्षा अन्नप्रक्रिया उद्योगासाठी भूखंडांची मागणी अधिक वाढू लागली आहे. त्यामुळे वायनरींसाठी राखीव भूखंड आता फुडपार्कसाठी खुले करण्यात येणार असून, तसा निर्णय राज्य शासन घेणार आहे. तथापि, विंचूरच्या वाइनपार्कच्या लगत केवळ अन्नप्रक्रिया उद्योगासाठी भूखंड देण्यासाठी राज्य औद्योगिक विकास महामंडळाने नुकतीच प्रक्रिया राबविली. आॅनलाइन पद्धतीने मागवण्यात आलेल्या अर्जांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महामंडळाच्या वतीने लवकरच या भूखंडांचे वितरण करण्यात येणार आहे.

Web Title:  The big response for the foodpark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.