राज्यपालांमुळेच बिहार संकटात...!

By admin | Published: February 16, 2015 12:12 AM2015-02-16T00:12:09+5:302015-02-16T00:12:09+5:30

जितनराम मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २० फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याआधी संयुक्त जनता दल आणि मित्र पक्षांनी आपल्या एकजूटतेचे प्रदर्शन करीत

Bihar crisis due to governor ...! | राज्यपालांमुळेच बिहार संकटात...!

राज्यपालांमुळेच बिहार संकटात...!

Next

मनमाड : येथील निमोण चौफुलीवर संशयास्पद आढळून आलेल्या रिक्षाचे गुढ उकलण्यात मनमाड शहर पोलिसांना यश मिळाले आहे. रिक्षाचालकाचा खून झाल्याचा प्रकार उघड झाला असून, या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करून कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
येथील चांदवडरोडवर निमोण चौफुलीवरील दराडे कॉप्लेक्ससमोर रिक्षा (क्र. एमएच १७ एजी ८१४५) ही बेवारस उभी असल्याची बाब पोलिसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आली. या रिक्षाच्या शिटवर व पडद्यावर रक्ताचे डाग असल्याने घातपाताचा संशय आल्याने पो.नि. भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रविण साळूंके,पो.ह.राजेंद्र पाटील, चंद्रकांत निर्मळ, संजय गुंजाळ, सुनिल पैठणकर,पारखे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. रिक्षा क्रमाकांवरून रिक्षा मालकाचा शोध लावण्यात आला.
सदरची रिक्षा कोपरगाव येथील गांधी नगर मधील दिलीप कचरू जेजूरकर यांची असल्याचे निष्पन्न झाले. जेजूरकर यांचे काही मित्र मनमाड येथे पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी आले असता त्यातील युवराज कुंभारे याच्या गळ्याला व कोपराला खरचटल्याच्या जखमा व त्याच्या संशयास्पद हालचाली पोलिसी नजरेतून सुटू शकल्या नाही.अधिक चौकशी करून पोलीसी खाक्या दाखवताच कुंंभारे याने आपन जेजूरकर याचा लाकडी दांडक्याने खून करून शव पाटचारीत सोडून दिले व त्याची रिक्षा मनमाड येथे सोडून दिल्याची कबूली दिली.सदरचा गुन्हा हा कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने संशयीत आरोपी रिक्षा सह कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Bihar crisis due to governor ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.