बिकानेर ते संगमनेर दुचाकीवरून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:09 PM2020-04-03T23:09:40+5:302020-04-03T23:09:59+5:30
कोरोनाच्या भीतीपोटी राजस्थान येथील बिकानेर येथून तब्बल ७०० कि.मी. अंतर कापत महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याचा वणी परिसरात गाडीवरून पडून अपघात झाला. या अपघातात पती गंभीर तर पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जखमी अवस्थेतील दांपत्याला होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.
वणी : कोरोनाच्या भीतीपोटी राजस्थान येथील बिकानेर येथून तब्बल ७०० कि.मी. अंतर कापत महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याचा वणी परिसरात गाडीवरून पडून अपघात झाला. या अपघातात पती गंभीर तर पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जखमी अवस्थेतील दांपत्याला होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.
राजस्थानच्या बिकानेर येथील कामनी येथे गेल्या काही कालावधीपासून वास्तव्य करणारे राममनोहर जगतापलाल विश्वकर्मा (वय ६०) हे पत्नी फरजाना राममनोहर विश्वकर्मा (वय ५०) यांच्या समवेत संगमनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. संगमनेर येथे असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हे दांपत्य गेल्या चार दिवसांपासून दुचाकीवर निघाले आहे. शुक्रवारी (दि.३) सकाळच्या सुमारास वणी-सापुतारा रस्त्यावरून हे दांपत्य मार्गक्र मण करत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात राममनोहर विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले, तर पत्नीला किरकोळ मार लागला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिकानेर ते संगमनेर अशा ७०० किलोमीटर अंतराचे नियोजन दुचाकीवरून प्रवास करण्याचे आखले होते. परंतु, वाटेतच त्यांच्या गाडीला अपघात झाला.