महिलांची हेल्मेटसह दुचाकी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:02 AM2019-01-28T00:02:14+5:302019-01-28T00:02:33+5:30

कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि.२६) सकाळी शहरातून छत्रपती संभाजीराजे स्टेडियमपासून सिटी सेंटर मॉलपर्यंत विविध प्रकल्पांच्या समावेशासह ढोल-ताशांच्या गजरात चित्ररथ प्रदर्शन व मिरणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थेच्या हजारो विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला होता.

 Bike Rally with Women's Helmet | महिलांची हेल्मेटसह दुचाकी रॅली

महिलांची हेल्मेटसह दुचाकी रॅली

Next

नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि.२६) सकाळी शहरातून छत्रपती संभाजीराजे स्टेडियमपासून सिटी सेंटर मॉलपर्यंत विविध प्रकल्पांच्या समावेशासह ढोल-ताशांच्या गजरात चित्ररथ प्रदर्शन व मिरणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थेच्या हजारो विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला होता.
निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी आणि अंबड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या उपस्थित रोबोटद्वारे ध्वज फडकावून चित्ररथाचे औपचारिक उद््घाटनानंतर हिरवा झेंडा दाखवून चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त अशोक मर्चंट, समीर वाघ, अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, विश्वस्त डॉ. के. एन. नांदुरकर, प्रा. एम. बी. झाडे आदी उपस्थित होते. या रथयात्रेत संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांतील आठ चित्ररथांनी सहभाग घेतला. भाऊसाहेबनगरच्या गीताई वाघ कन्या विद्यालयाच्या मुलींनी ढोल आणि लेजीम पथकाने मिरवणुकीने शोभा वाढविली. संस्थेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा केली होती. ललित महाविद्यालयाचा नटराजाचे चित्रण, कृषी महाविद्यालयाचे शेती तंत्रज्ञानातील उपकरणे आकर्षणाचा विषय ठरले. या मिरणुकीत शहर वाहतूक पोलीस रथाचाही समावेश करण्यात आला होता.
इलेक्ट्रॉनिक वाहनांची प्रात्यक्षिके
रथयात्रेत संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांतील आठ चित्ररथांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दुचाकी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वाहने यांचे उत्तमनगर, पवननगर आणि त्रिमूर्ती चौकात प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या या चित्ररथांच्या मिरवणुकीत हजारो महिलांनी दुचाकींसह हेल्मेटचा वापर करीत सहभाग घेत सर्वांनी आपल्या सुरक्षेसाठी हेल्मट वापरण्याचे आवाहन केले.

Web Title:  Bike Rally with Women's Helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.