चासखिंडीत दुचाकीस्वाराला बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 11:06 PM2020-03-01T23:06:05+5:302020-03-01T23:07:14+5:30
नांदूरशिंगोटे : येथून जवळच असलेल्या नांदूरशिंगोटे-चास रस्त्यालगत असणाऱ्या चास खिंडीत रविवारी (दि.१) पहाटे सहा वाजेच्या सुमारास दुचाकीस्वाराला बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे बिबट्याला पाहिल्यानंतर त्याची पाचावर धारण बसत त्याने दुचाकीसह नांदूरगावाकडे धूम ठोकली.

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे-चास रोडलगत मध्यवर्ती ठिकाणी चास खिंड आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वनविभागाचे जंगल आहे. त्यामुळे या भागात बिबट्याचा नेहमीच वावर असतो. भोजापूर व चास भागातून सकाळच्या वेळेस काही कामगार दुचाकीने औद्योगिक वसाहतीत कामाला जात असतात. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास एक कामगार दुचाकीने खिंड ओलांडून नांदूरशिंगोटेकडे येत असताना रस्ता कडेला त्याला बिबट्याचे दर्शन झाले. यापूर्वीही या भागात अनेकांना बिबट्या दिसला असल्याचे नागरिकांनी सांगितले.