लालपाडी येथे बिबटया जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 02:17 PM2020-04-11T14:17:11+5:302020-04-11T14:17:37+5:30
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील लालपाडी येथे गेल्या महिनाभरात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील लालपाडी येथे गेल्या महिनाभरात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
गोदाकाठ भागात नेहमीच बिबट्याचा संचार असतो. काही दिवसांपासून निफाड तालुक्यातील लालपाडी गावातील मोठया प्रमाणात बिबट्याचा वावर दिसून येत होता. पंंधरा ते वीस दिवसापूर्वी लालपाडी येथे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून येताच स्थानिक नागरिकांनी संबंधित माहिती वनविभागाला दिली. याची दखल घेऊन वन परिक्षेत्र अधिकारी भंडारी यांनी विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. मागील पंधरा दिवसापूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात शुक्र वारी पहाटेच्या वेळी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. लालपाडी येथील माणिक जगन्नाथ सानप यांच्या (गट क्र ७९) शेतात बसविलेल्या पिंजºयात मागील पंधरा दिवसापूर्वी नागरिकांच्या मागणी नुसार पिंजरा बसविण्यात आला होता. शुक्र वारी पहाटेया सुमारास बिबटयाला जेरबंद करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात याच शेतात बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं.
-------------------------
पिंज-यात अडकलेली बिबट मादी असून तिचे वय साधारण चार वर्षे आहे.या जेरबंद मादीला निफाड येथील प्राणी नर्सरी येथे सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे. नंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी करून पून्हा जंगलात सोडणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली.