बळीराजा हवालदिल : भाव नसल्याने साठवणुकीकडे कल देवगाव परिसरात कांद्याचे विक्रमी उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:57 PM2018-05-08T23:57:50+5:302018-05-08T23:57:50+5:30
देवगाव : मागील वर्षी देवगाव परिसरात चांगला पाऊस झाल्याने व डाव्या कालव्याच्या आवर्तनावर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.
देवगाव : मागील वर्षी देवगाव परिसरात चांगला पाऊस झाल्याने व डाव्या कालव्याच्या आवर्तनावर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला समाधानकारक बाजारभाव नसल्याने कांदा चाळीत साठवणुकीकडे कल वाढला आहे.
उन्हाळ कांदा साठवणुकीसाठी परिसरातील बहुतेक शेतकºयांनी शासनाच्या कांदा चाळ अनुदान योजनेतून पक्क्या कांदा चाळी बांधल्या आहेत. त्या कांदा चाळी भरूनही बºयाच शेतकºयांकडे कांदे शिल्लक राहिल्यामुळे अशा शेतकºयांनी कुडाच्या (तुराठ्याच्या) कच्च्या कांदा चाळी बनवून कांदे साठविले आहेत. एप्रिलमध्ये साधारणत: कांदे काढत्या वेळी अकराशे रुपये क्विंटलच्या दरम्यान बाजारभाव असता तर शेतकºयांनी कांदे विकणे पसंत केले असते. कांदे काढल्याबरोबर विक्रीस नेले तर वजन चांगले येते. शिवाय ताजा कांदा असल्याने त्यात खराबा निघत नाही. त्यामुळे कांदा साठवणुकीचा खर्च वाचतो तसेच साठवणुकीनंतर दोन ते तीन महिन्यांनी सतराशे ते दोन हजार रुपये क्विंटलदरम्यान विकले जाणारे कांदे आज हजार अकराशे भावात परवडतात. शिवाय लाल कांद्याचे सरासरी उत्पादन दुपटीच्या आसपास निघते. तसेच उत्पादनवाढीमुळे समाधानकारक बाजारभाव राहिले.