वीज जोडणी न देताच बिलाची आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:23 AM2021-04-22T00:23:00+5:302021-04-22T00:24:30+5:30

शेतीसाठी वीज जोडणी न करताच तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रंजक महाराज ढोकळे यांना महावितरणने ९७१० रुपयांचे बिल काढले आहे. याबाबत या शेतकऱ्याने आता महावितरणलाच कायदेशीर नोटीस बजावली असून ग्राहक न्यायालयातही दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. 

Billing without electricity connection | वीज जोडणी न देताच बिलाची आकारणी

वीज जोडणी न देताच बिलाची आकारणी

Next
ठळक मुद्देमहावितरणचा भोंगळ कारभारडोंगरगावच्या शेतकऱ्याला आला अनुभव

येवला : शेतीसाठी वीज जोडणी न करताच तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रंजक महाराज ढोकळे यांना महावितरणने ९७१० रुपयांचे बिल काढले आहे. याबाबत या शेतकऱ्याने आता महावितरणलाच कायदेशीर नोटीस बजावली असून ग्राहक न्यायालयातही दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. 
तालुक्यातील  डोंगरगाव येथील शेतकरी रंजक महाराज ढोकळे यांनी २०१० साली शेतीसाठी नवीन वीज जोडणीसाठी ४६०० रुपयाचे कोटेशन शुल्क भरुन महावितरणकडे अर्ज केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये म्हणजे तब्बल १० वर्षांनी त्यांच्या माळावरील शेतात महावितरणने नवीन जाेडणीसाठी डी. पी. बसवून दिली. 
मात्र सदर डी.पी. सोबत असलेला ट्रान्सफॉर्मर हा फॉल्टी असल्याने,  सदर डी.पी. ला वीज सप्लाय दिलाच नाही. सदर ट्रान्सफॉर्मर बदलून मिळावा म्हणून रंजक ढोकळे यांनी येवला येथील महावितरणच्या कार्यालयात अनेक  फेऱ्या मारल्या पण महावितरणने कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, रंजक ढोकळे हे मागील महिन्यात पुन्हा 
एकदा महावितरणच्या येवला 
येथील उप विभागीय कार्यालयात गेले असता त्यांच्या हातावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी 
चक्क ९७१० रुपयांचे बिल थोपविले व सदर रक्कम भरल्याशिवाय आपल्याला नवीन ट्रान्सफॉर्मर 
देणार नाही असे सांगितले. त्यामुळे 
या शेतकऱ्याने आता महावितरणला तब्बल ५ लाख रूपयांची 
नुकसान भरपाई देण्याची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. 
सततच्या वीज भारनियमनाने ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त
n जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सतत होणाऱ्या वीज भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी रात्री वीज देण्यात येते, दुपारी पुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. महावितरणने समान वेळेत वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Billing without electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.