पेस्ट कंट्रोल ठेक्याची कोट्यवधींची उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:46 AM2019-11-05T00:46:51+5:302019-11-05T00:46:56+5:30
नाशिक : महापालिकेच्या वतीने पेस्ट कंट्रोलचा ठेका काढताना तीन वर्षांत थेट वीस कोटी रुपयांची वाढ झाल्याने यासंदर्भात आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात आयुक्तांना सादर केला जाणार आहे. १९ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा पूर्वीचा ठेका आता थेट ३९ कोटी रुपयांवर पोहोचल्याने त्याबाबत शंका घेतली जात असल्याने ही समिती नियुक्त करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिकेच्या वतीने दरवर्षी डास निर्मूलनासाठी पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला जातो. तीन वर्षांपूर्वी १९ कोटी रुपयांचा हा ठेका होता. मात्र संबंधित ठेकेदाराच्या कामकाजाविषयी प्रचंड तक्रारी होत्या. त्यानंतरही राजकीय हस्तक्षेपाने हा ठेका कायम राहिला
२० कोटींचा प्रश्न... महापालिकेने विलंबाने ठेका दिला असला तरी ठेक्याची रक्कम वाढून ती थेट ३९ कोटी रुपयांवर ठेका गेल्याने त्याविषयीदेखील शंका घेतल्या जात होत्या. या तीन वर्षांत असे काय घडले की ठेक्याने २० कोटी रुपयांची उड्डाणे झाली असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.