गुलाब उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:49 PM2020-05-05T22:49:13+5:302020-05-05T23:20:47+5:30

नाशिक : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक (गुलाब) शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काहींनी गुलाबाच्या बागेत भाजीपाला लावला आहे.

 Billions hit rose growers | गुलाब उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

गुलाब उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

googlenewsNext

नाशिक : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक (गुलाब) शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काहींनी गुलाबाच्या बागेत भाजीपाला लावला आहे.
फूलशेतीमध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात सुमारे १५० एकरवर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. विशेषत: नाशिक, दिंडोरी, निफाड आदी तालुके आघाडीवर आहेत. काही शेतकरी स्थानिक बाजारात गुलाबाची विक्र ी करतात, तर अनेक शेतकरी मुंबई, सुरत, बंगलोर येथील बाजारपेठेत माल पाठवतात. दरवर्षी या काळात लग्नसराई, रमजानपर्व, विविध सण उत्सव असल्याने फुलांना चांगली मागणी असते. एका सर्वसामान्य शेतकºयाचा किमान ३०० ते ५०० डझन इतकी गुलाबाची फुले दररोज बाजारात जात असतात. खुल्या शेतीतील फुलांना थोडा कमी भाव मिळत असला तरी पॉली हाउसमधील गुलाबाला किमान १०० रु पये डझनपर्यंत भाव मिळत असतो. गुलाबाच्या एक एकर शेतीतून शेतकºयाला वार्षिक ३.५० ते ४ लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळत असते. या वर्षी मात्र शेतकऱ्यांना या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. या संकटामुळे अनेक शेतकºयांनी यावर्षी उत्पादन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
फुलविक्र ीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. यामुळे यावर्षी गुलाबाचे उत्पादन घेतले नाही. गुलाबाच्या बागेत भाजीपाला केला आहे. दोन महिन्यांत लग्नसमारंभ, रमजान पर्व, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, आखाजी, हनुमान जयंती असे सण उत्सव असतात यामुळे गुलाबाला चांगली मागणी असते. याशिवाय यावर्षी मंदिरेही बंद आहेत. आमचे किमान २.५० ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे.
- योगेश नळे, गुलाब उत्पादक शेतकरी, कसबे सकेणे, ता. निफाड

Web Title:  Billions hit rose growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक