सिन्नर नगरपरिषदेकडून फेरीवाल्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 05:38 PM2019-03-09T17:38:29+5:302019-03-09T17:38:43+5:30
सिन्नर : केंद्र शासनाच्या पथ विके्रता (उपजीविका संरक्षण व विक्री विनियमन) अधिनियम ङ्क्त २०१४ मधील कलम ३६ (१) अन्वये राज्य शासनाने ‘पथ विक्रेता योजना २०१७ मंजूर केलेली आहे.
सिन्नर : केंद्र शासनाच्या पथ विके्रता (उपजीविका संरक्षण व विक्री विनियमन) अधिनियम ङ्क्त २०१४ मधील कलम ३६ (१) अन्वये राज्य शासनाने ‘पथ विक्रेता योजना २०१७ मंजूर केलेली आहे. त्यानुसार सिन्नर नगरपरिषद, सिन्नर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य या घटकांतर्गत फेरीवाल्यांचे मोबाईल अॅपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षणाचा प्रारंभ मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्या., ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सिन्नर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व पथविक्रेत्यांचे मोबाईल अॅपद्वारे बायोमेट्रिक सर्वेक्षण केल्या जात असून, नगरपरिषद कार्यक्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या परवानाधारक व विनापरवानाधारक फेरीवाला व्यावसायिकांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक स्वत:च्या आधार कार्डशी संलग्न करून ठेवणे आवश्यक आहे. आधार कार्डची प्रत, रेशनकार्ड प्रत, महाराष्ट्रातील अधिवास असल्याचे सक्षम प्राधिकरणाकडील अधिवास प्रमाणपत्र प्रत, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत, विधवा, परीतक्ता, एकल महिला असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत, अनुसूचित जाती-जमातींत समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत, बँक खाते पुस्तक प्रती मोबाईल अॅपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करताना जवळ तयार ठेवाव्यात.