मालेगाव मनपाने दिलेला बायोमायनिंगचा ठेका अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:15 AM2021-04-02T04:15:06+5:302021-04-02T04:15:06+5:30
------------------------ काँग्रेसने ठेका रद्द केल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेसने ठेका रद्द करण्याचे कारण स्पष्ट न करता ठेका रद्द केल्यामुळे हे ...
------------------------
काँग्रेसने ठेका रद्द केल्याचा आरोप
सत्ताधारी काँग्रेसने ठेका रद्द करण्याचे कारण स्पष्ट न करता ठेका रद्द केल्यामुळे हे ढोंगपण असल्याची टीका महागठबंधन आघाडीच्या गटनेत्या शान- ए- हिंद व नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी यांनी महासभेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. बायमायनिंगची निविदा प्रक्रिया ही बोगस पद्धतीने काढण्यात आली होती. ठेकेदाराला देण्यात येणारी निर्धारित रक्कम निश्चित करण्यात आली होती. मात्र, कामाचे स्वरूप निश्चित नव्हते. जनता दलाने निविदा प्रक्रियेपासूनच याला विरोध केला होता. शहरातील नागरिकांचे पैसे वाया घालून ठेकेदारांच्या घशात घालण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव होता. आतादेखील ठेका रद्द करून ठेकेदाराला पाठबळ दिले जात आहे. कागदावरच हा ठेका रद्द न करता प्रत्यक्षात म्हाळदेशिवारातील डंपिंग ग्राउंडवरील ठेकेदाराचे कामकाज बंद केल्यास जनता दल या निर्णयाचे स्वागत करेल. आतापर्यंत सुमारे २५ ते २६ कोटी रुपये कचऱ्यात वाया गेले आहे. कचऱ्यातून आर्थिक हित साधले जात असल्याचा आरोपही मुस्तकीम डिग्निटी यांनी केला.
--------------------------
काय होते बायोमायनिंग प्रकरण
महापालिकेने डंपिंग ग्राउंडवर घन कचऱ्याची शास्त्रोक्त (बायोमायनिंग) पद्धतीने घनकचरा वर्गीकरण व खत निर्मिती प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या कामासाठी मनपाने ३ कोटी १० लाखांची निविदा काढली होेती. पुरवठा आदेशात अत्याधुनिक मशीनच्या दोन नगांसाठी १ कोटी ८० लाख रुपये नमूद केले आहेत. एका मशीनद्वारे घनकचरा वर्गीकरण प्रक्रिया सुरू केली होती. दुसरी मशीन बसवून घेणे गरजेचे असताना या मशीनसाठी जागा उपलब्ध करून न देता पहिली मशीन बंद केली. कचरा वर्गीकरण प्रक्रिया थांबल्याने जनतेच्या पैशांचे नुकसान झाले आहे. प्रकल्प बंद पडून दुसरी मशीन खरेदी न करता जागा देण्यास टाळाटाळ केल्याने ठेकेदार कंपनीने उच्च न्यायालयात मनपा विरोधात रिट याचिका दाखल केली आहे. एक प्रकल्प एक निविदा संपुष्टात आणून दुसरी निविदा निर्गमित केली. या विषयावरून सत्ताधारी काँग्रेसला विरोधकांनी कोंडीत पकडले होते.
===Photopath===
010421\01nsk_28_01042021_13.jpg
===Caption===
मालेगाव मनपा महासभेत बायोमानिंग ठेक्यावर बोलताना महापौर ताहेरा शेख. समवेत उपमहापौर निलेश आहेर, उपायुक्त रोहिदास दोरकुरळकर, नगरसचिव शाम बुरकुल आदि.