मालेगावी महिला महाविद्यालयात जैवविविधता दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:44+5:302021-05-24T04:12:44+5:30

नाशिक येथील डीवायएएस अकॅडमीचे संचालक प्रा.देविदास गांगुर्डे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी जैवविविधतेचा अभ्यास करणे ही ...

Biodiversity Day celebrated at Malegaon Women's College | मालेगावी महिला महाविद्यालयात जैवविविधता दिवस साजरा

मालेगावी महिला महाविद्यालयात जैवविविधता दिवस साजरा

Next

नाशिक येथील डीवायएएस अकॅडमीचे संचालक प्रा.देविदास गांगुर्डे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी जैवविविधतेचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, तसेच विविध प्रकारच्या वनस्पती व त्यांचा मानवी जीवनात असणारे महत्त्व पटवून सांगितले. सर्वच प्राणी, पशुपक्षी यांचे संवर्धन होणे गरजेचे असून, मानवाच्या कल्याणासाठी व अस्तित्वासाठी जैवविविधता महत्त्वाची आहे, तसेच मानवाचे आरोग्य हेही जैवविविधतेवर अवलंबून असल्याचे प्रा.गांगुर्डे यांनी सांगितले.

येवला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे यांचेही भाषण झाले. नाशिक येथील शिवशक्ती अकॅडमीचे संचालक मनोहर जगताप यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत माहिती देऊन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश दिला.

प्राचार्य डॉ.उज्ज्वला देवरे यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ.देवराम जाधव यांचे अध्यक्षीय भाषण झाले. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.झिया अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले, तसेच प्रा.योगिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Web Title: Biodiversity Day celebrated at Malegaon Women's College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.