त्र्यंबकेश्वरला जैव विविधता दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:24 PM2018-05-24T14:24:51+5:302018-05-24T14:24:51+5:30
त्र्यंबकेश्वर : येथे जैव विविधता दिनानिमित्त स्थानिक ग्रामस्थांनी वनसरंक्षण व वनसंवर्धन कसे करावे याबाबत विशेष सहकार्य करु न मदत केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्र्यंबकेश्वर : येथे जैव विविधता दिनानिमित्त स्थानिक ग्रामस्थांनी वनसरंक्षण व वनसंवर्धन कसे करावे याबाबत विशेष सहकार्य करु न मदत केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जैव विविधतेचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी सांगितले. तसेच वनसंरक्षण कसे करावे व वन संवर्धनाचे आपल्या जीवनात काय फायदे आहे. याबाबतही सविस्तर विवेचन केले. या कार्यक्र माला जोडुनच एलपीजी गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी २० लाभार्थ्यांना भारत गॅसचे वाटप करण्यात आले. या कार्यक्र मास वनस्पती शास्त्राचे प्रा.शरद कांबळे , प्राणी शास्त्राचे प्रा. विनय देठे , प्राणीशास्त्र व पक्षी निरीक्षक सागर मेढे, पहिणे येथील पोलीस पाटील संजय अंबापुरे, पहिणेचे सरपंच काशिनाथ डगळे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशिनाथ वारघडे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सचिव सखाराम वारघडे , जिल्हा परिषद सदस्य शकुंतलाबाई डगळे, सुनील जगताप, पोलिस पाटील कोजोली उपस्थित होते. सूत्रसंचालन दर्शना सौपूरे यांनी केले.