नाशिक महापालिका ठरविणार जैवविविधता धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:50 AM2019-02-11T00:50:13+5:302019-02-11T00:50:32+5:30
महापालिकेच्या वतीने कशीही आणि कोणतीही झाडे लावल्यानंतर त्याचा पर्यावरणदृष्ट्या दीर्घकाळासाठी लाभ होतो किंवा नाही याचा सध्या विचार केला जात नाही, परंतु आता मात्र महापालिका आगामी पन्नास वर्षांत किती आणि कोणती झाडे टिकू शकतील याचे आगामी पन्नास वर्षांचे धोरण ठरवून विकास करणार आहे. त्यासंदर्भात धोरण ठरवण्याचादेखील महापालिकेचा विचार सुरू आहे. येत्या १६ फेबु्रवारीस देवराईच्या संकल्पनेचा प्रसार करणारे अभिनेता सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिकेत एक बैठक होणार आहे. त्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने कशीही आणि कोणतीही झाडे लावल्यानंतर त्याचा पर्यावरणदृष्ट्या दीर्घकाळासाठी लाभ होतो किंवा नाही याचा सध्या विचार केला जात नाही, परंतु आता मात्र महापालिका आगामी पन्नास वर्षांत किती आणि कोणती झाडे टिकू शकतील याचे आगामी पन्नास वर्षांचे धोरण ठरवून विकास करणार आहे. त्यासंदर्भात धोरण ठरवण्याचादेखील महापालिकेचा विचार सुरू आहे.
येत्या १६ फेबु्रवारीस देवराईच्या संकल्पनेचा प्रसार करणारे अभिनेता सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिकेत एक बैठक होणार आहे. त्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सामान्यत: अनेकदा महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड करताना कोणत्याही प्रकारचे धोरण ठरविलेले गेलेले नाही. त्यामुळे गुलमोहर किंवा अन्य अनेक झाडे फारशी उपयुक्त ठरत नाही. काही विदेशी प्रजातीची झाडे ही रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली असून, पावसाळ्यात अशी झाडे पडल्याने अपघातही संभवत असतात. वृक्षलागवड हा शहरातील नागरिकांच्या दृष्टीने आनंदाचा भाग असला पाहिजे, परंतु झाडे तोडावित म्हणून तक्रारी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आता अधिक विचारपूर्वक आणि दीर्घकाळ टिकणारी मुख्यत्वे म्हणजे नागरिकांना सोयीची वाटेल, अशी उपयुक्त झाडे लावण्याचे धोरण ठरविण्याचा विचार सुरू आहे. आगामी पन्नास वर्षे अशाप्रकारची झाडे टिकावीत यादृष्टीने वृक्षारोपण करण्याचे एक धोरणच महापालिका ठरवणार असून, त्यादृष्टीने आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान उपयुक्त शिवाजी आमले हे तयारी करीत आहेत.
४महापालिकेच्या वतीने सहा विभागात देवराई तयार करण्यात येत असून, वृक्षारोपणाला धार्मिक महत्त्व देऊन त्या माध्यमातून वृक्षसंवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेच्या वतीने बैठक होणार आहे. त्यात यावर चर्चा करून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.