बायोगॅस प्रकल्प ठरतोय डोकेदुखी
By admin | Published: March 20, 2017 11:46 PM2017-03-20T23:46:48+5:302017-03-20T23:47:15+5:30
दुर्गंधीमुळे नाराजी : सापगाववासीयांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडेत्
र्यंबकेश्वर : येथील नगरपालिकेच्या वतीने सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने साकारण्यात आलेला सापगाव शिवारातील बायोगॅस प्रकल्प सापगाववासीयांना दुर्गंधीमुळे त्रासदायक ठरत आहे. हा प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी सरपंच सीताबाई दिवे, उपसरपंच रामदास दिवे, पंढरीनाथ दिवे आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे.
सुमारे १३ लाख रु पये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. वास्तविक हा प्रकल्प उभा करताना सापगाव ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेणे गरजेचे होते. या प्रकल्पाचे दूषित पाणी बाजूच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत मिसळले जात असल्याने लोकांनी विहिरीचे पाणी पिणे बंद केले आहे. तथापि, थोड्याच अंतरावर असलेल्या पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. ४०० ते ५०० लोक तेथे पाणी भरतात. त्या विहिरीतदेखील बायोगॅसचे दूषित पाणी पाझरून प्यायचे पाणीदेखील दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
हॉटेलांमधील उरलेले शिळे अन्न, शहरातील ओला कचरा आदि या बायोगॅसचे खाद्य. तेथील टिपांमध्ये हे नासके अन्न ठेवले जाते. त्या अन्नाची व आउटलेटच्या घाणीची दुर्गंधी जवळपास दोन किलोमीटर अंतरावर येत असते. याबाबत सापगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आदिंनी त्यांची भेट घेऊन कैफीयत मांडली. (वार्ताहर)