जैविक खते व पिके ही काळाची गरज : श्रीधर देसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:10 PM2018-02-25T13:10:15+5:302018-02-25T13:10:15+5:30
उत्पादनवाढीसाठी जैविक खते आणि पिके ही काळाची गरज असल्याचे मत धुळे येथील कृषि शास्त्रज्ञ डॉ.श्रीधर देसले यांनी व्यक्त केले आहे.कृषि विभाग आणि कृषि व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने नाशिक कृषी महोत्सवात कांदा व भाजीपाला या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
नाशिक : उत्पादनवाढीसाठी जैविक खते आणि पिके ही काळाची गरज असल्याचे मत धुळे येथील कृषि शास्त्रज्ञ डॉ.श्रीधर देसले यांनी व्यक्त केले आहे.कृषि विभाग आणि कृषि व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने नाशिक कृषी महोत्सवात कांदा व भाजीपाला या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक अशोक कांबळे, उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, गोकुळ वाघ, गणेश वाकळे, तुषार आमले, संजय पारडे आदी उपस्थित हेते.
डॉ. देसले म्हणाले, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी मुख्य, दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्याचा अभ्यास करून खतांचा वापर करावा. त्यानंतरच उत्पादक क्षेत्रचा विचार करायला हवा. जमिनीनुसार योग्य पीक निवडल्यास उत्पादनात यश मिळते. सध्या सुक्ष्म अन्नपदार्थ, गंधक, पालाश कमी झाल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. म्हणून माती परिक्षणानंतर खतांचा वापर करावा तसेच हवामानाच्या बदलानुसार करावयाच्या उपययोजनांचादेखील विचार शेतकऱ्यांनी करावा, अशी सुचना त्यांनी केली. कांद्याचे पीक हंगामानुसार बदलणारे असल्याने शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. कांदा पिकाच्या आजूबाजूस मक्याची लागवड करावी. बुरशीमुळे बियाण्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गंधक, सुक्ष्म पदार्थ, पालाश यांची मात्र योग्य प्रमाणात द्यावी, असेही त्यांनी सांगितले.