‘बायोस्पेक्ट्रा’ महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:17 AM2020-01-10T00:17:36+5:302020-01-10T00:18:04+5:30
चांद्रयान व मंगळयानाच्या प्रतिकृतींसह अंतराळातील विविध घडामोडींचे सादरीकरण करणाऱ्या कल्पनाविष्कारांचे सादरीकरण करून के. के. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बायोस्पेक्ट्राच्या पहिल्याच दिवशी विज्ञानप्रेमींना अंतराळाची सफर घडविली.
नाशिक : चांद्रयान व मंगळयानाच्या प्रतिकृतींसह अंतराळातील विविध घडामोडींचे सादरीकरण करणाऱ्या कल्पनाविष्कारांचे सादरीकरण करून के. के. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बायोस्पेक्ट्राच्या पहिल्याच दिवशी विज्ञानप्रेमींना अंतराळाची सफर घडविली.
वाघ महाविद्यालयातील विज्ञान मंचातर्फे तीन दिवसीय बायोस्पेक्ट्रा महोत्सवाचे गुरुवारी (दि.९) माजी विद्यार्थिनी स्नेहल जाधव हिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर महाविद्यालय समन्वयक व्ही. एम. सेवलीकर, प्राचार्य डॉ. ए. पी. राजपूत, विज्ञान विभाग प्रमुख अर्चना कोते, दामिनी करसाळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अंतराळ तंत्रज्ञान विषयाला अनुसरून प्रयोगशांळाची विद्यार्थ्यांनी विशेष कल्पकतेतून सजावट केली होती. बायोस्पेक्ट्राचे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी परदेशी शिक्षणाच्या संधीविषयी अमित गोरे व मीनल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. मॉडेल प्रदर्शन व इंडिया-२०२० विषयावरील विज्ञान रांगोळीनेही लक्ष वेधून घेतले. प्रास्ताविक दीक्षा बोराडे यांनी केले, सूत्रसंचालन मुस्तफा इनामदार यांनी केले. धनंजय पाटील यांनी आभार मानले.