मानोरी येथे पक्ष्याच्या दाण्या-पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 09:07 PM2020-05-09T21:07:41+5:302020-05-10T00:52:17+5:30
मानोरी : यंदा कोरोना विषाणू प्रकोपाने लॉकडाउनमुळे चिमण्यांसह पक्ष्यांना दाणा-पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मानोरी बुद्रुक येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडिअम गुरुकुलात शिकणाऱ्या सायली वावधाने या चिमुकल्या विद्यार्थिनीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय केली आहे.

पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय करण्याचे सायली वावधानेचे हे चौथे वर्ष आहे. वातावरणात अचानक बदल होत असून, ढगाळ वातावरणामुळे मागील पंधरा दिवसांपासून उष्णतेचा पारा चाळिशी पार गेला. विविध पक्ष्यांचा किलबिलाट मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. मानोरीत काही दिवसांपूर्वी सार्वजनिक पाणवठे, पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ साचलेले पाणी, डबके अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिमणी, कावळे, साळुंकी, करकोचे असे विविध प्रकारचे पक्षी पाणी पिताना दिसून येत होते. एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई अचानक उष्णता वाढल्याने या पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करून आपली तहान भागविणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. अशातच येथील सायली वावधाने हिने आपल्या घरासमोरील वृक्षांनाच बाटल्या कापून तसेच नरसाळे आदींना झाडांच्या मध्यभागी बांधून या चिमण्या, कावळे, साळुंक्या आदी पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय केली आहे. यामुळे भर उन्हात होणारी पक्ष्यांची भटकंती थांबली आहे. दिवसभरात या वृक्षावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पक्षी, चिमण्या आपली तहान आणि भूक भागविण्यासाठी येत
असतात.