नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयआरण्य पक्षी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:30 PM2019-12-31T22:30:50+5:302019-12-31T22:32:30+5:30

सायखेडा : महाराष्टÑात भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात नववर्षाच्या स्वागताला अनेक विदेशी पाहुणे दाखल झाले असून, धरण परिसर पक्ष्यांचा किलबिलाट आणि पक्षप्रेमींच्या गर्दीने गजबजु लागले आहे.

Bird Sanctuary at Nandurmideeshwar | नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयआरण्य पक्षी दाखल

नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयआरण्य पक्षी दाखल

Next
ठळक मुद्देनवीन वर्षाच्या सुरु वातीला पक्षीप्रेमी अन् पर्यटकांसाठी मेजवानी

बाजीराव कमानकर
सायखेडा : महाराष्टÑात भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात नववर्षाच्या स्वागताला अनेक विदेशी पाहुणे दाखल झाले असून, धरण परिसर पक्ष्यांचा किलबिलाट आणि पक्षप्रेमींच्या गर्दीने गजबजु लागले आहे.
नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला आंतराष्ट्रीय दर्जेचे रामसेज पक्षी अभयारण्य म्हणून दर्जा मिळाला आहे. त्यामुळे काही वर्षात पक्षीप्रेमी आणि पर्यटकांची गर्दी येथे वाढत आहे.
गोदावरी नदीच्या उगमस्थानापासून अवघ्या ऐंशी किलोमीटर अंतरावर नांदुरमध्यमेश्वर आणि खानगा शिवावर इस १९१० मध्ये इंग्रजांनी धरण बांधले आहे. धरण परिसरात काळी कसदार जमीन आणि कादवा, गोदावरी नदीचा संगम यामुळे हा दलदलीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
जगातील अनेक देशांमध्ये, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कडक उन्हाळा असतो. त्या देशातील विविध जातींचे पक्षी उन्हाच्या झळा सोसू शकत नाही असे पक्षी दलदलीच्या प्रदेशाचा शोध घेतात. अशा पक्षांना पिण्यासाठी पाणी, दलदलयुक्त चिखल, खाण्यासाठी चिखलात रहाणारे कीटक, मासे, डोंबकावळे, पानकोंबडी असे भक्ष्य हवे असते. नांदुरमध्यमेशवर धरण परिसरात अनुकूल वातावरण निर्माण होत असते त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक पक्षांचे आगमन झाले आहे.
विदेशातील कच्छ, पाकिस्थान, लडाख, कजिस्तान या देशातून विविध प्रजातीच्या पक्षांचे आगमन झाले आहे. हिवाळा ऋतू अनेक पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी मेजवानी ठरतो. या भागात पक्षांचे आगमन झाले की गर्दी वाढायला सुरवात होते. देश, विदेशातील पाहुण्यासोबत राज्यातील अनेक पक्षीप्रेमी या ठिकाणी भेट देऊन पक्षी पहाण्याचा आनंद घेतात.
पक्षी निरीक्षणासाठी भुसे फाट्यापासून काही अंतरावर शासनाच्या वतीने मनोरे तयार करण्यात आली आहेत. याठिकाणी दुर्बिण देखील उपलब्ध करून देण्यात येते, ठिकठिकाणी उभारण्यात आलेली मनोरे पर्यटकाला पक्षांच्या आगदीच जवळ घेऊन जातात. दलदलीचा प्रदेश, आजूबाजूला उसाची शेती, धरणातील पसरललेले पाणी, आणि पक्षांचा किलबिलाट यामुळे येथील वातावरण मनाला भुरळ घालते.

चौकट....
नांदुरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्यात फ्लोमिंगो, राखी बगळा, करकोचा, बदक, शराटी, बापट्या, हळदीकुंकू, तलवार बदक, भुवई बदक, मळवट बदक, टिटवी, रंगीत करकोचा, जांभळी पानकोंबडी, कोकीळ, चातक, भारद्वाज, किंगिफशर, वेडाराघू, नीलकंठ, खाटीक, डोंबारी, बुलबुल, भिंगरी, दयाळ, चिरफ, कोतवाल, घार, मधुबान, कापसी, घाट, मोरघाट, ससाणा, सातभाई, शिंपी, वरवंटे, गरु ड, केस्टरल असे जवळपास पंधरा हजार प्रजातीचे पक्षी तर बाराशे गवताळ प्रदेशातील पक्षी दाखल झाले आहे.

महाराष्ट राज्यातील भरतपूर म्हणून ओळख असणाºया नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्यात विविध प्रकारचे पक्षी दाखल झाले आहे. त्यांना योग्य असणारी थंडी आणि दलदलयुक्त चिखल असल्याने पक्षी काही दिवस या ठिकाणी आपला मुक्काम करतील पक्षीप्रेमी यांच्यासाठी हि नवीन वर्षाच्या सुरु वातीला मेजवानी आहे.
- जगदीश आघाव, गाईड.

नांदुरमध्यमेश्वर धरण परिसरात वर्षानुवर्षे विविध प्रजातीचे पक्षी येतात ठाण मांडून काही महिने करमणूक करतात. मात्र त्यांना पहाण्यासाठी येणाºया पक्षीप्रेमी आणि पर्यटकांनी काही बंधने पाळली पाहिजे. या भागातील शेतकरी, आणि नागरिक यांना त्रास होणार नाही. याची काळजी घ्यावी. नैसर्गिक निर्मिती असलेल्या विविध पक्षांच्या कलागुणांचा आनंद घ्यावा.
- गणपत हाडपे, मांजरगाव.
 

Web Title: Bird Sanctuary at Nandurmideeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.