बिऱ्हाड पाठीवर, शिदोरी सोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:31+5:302020-12-22T04:15:31+5:30
बिऱ्हाड पाठीवर, शिदोरी सोबत तीन दिवस प्रवास करून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली शिदोरी सोबत घेऊन प्रवासाला सुरुवात ...
बिऱ्हाड पाठीवर, शिदोरी सोबत
तीन दिवस प्रवास करून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली शिदोरी सोबत घेऊन प्रवासाला सुरुवात केली आहे. शिवाय चांदवड, शिरपूर अशा ठिकाणी तेथील स्थानिक शेतकरी व नेता आंदोलकांच्या निवासाची आणि भोजनाची सोय करणार आहे
इन्फो-२
प्राणार्पण करणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या आंदोलनात गत २५ दिवसांत ३६ शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यास सरकार दोषी असल्याचा आरोप करीत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत मोदी, शाह यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
इन्फो ३
केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी कायद्यांसोबतच लेबर कोड कायद्यांचा जोरदार फटका कामगारांनाही बसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. असा कामगार या आंदोलनात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे. त्याचप्रमाणे अन्नदात्यांच्या या लढाईत महिला, युवा, विद्यार्थी, व्यापारी, वकील, शिक्षक अशा सर्व स्तरांतील लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत आंदोलनात एकत्र आले आहेत.
इन्फो...
हमे चाहीये आझादी...
घोषणा, शाहिरी गीत आणि अन्य लयबद्ध घोषणांनी गोल्फ क्लबचा परिसर दुमदुमून गेला हेाता. दुपारी सर्वप्रथम नगरचा जत्था दाखल झाला. त्यानंतर जसजसे जत्थे वाढू लागले तशा ‘हमे चाहीये आझादी, होश मे आके बात करो’ अशा अनेक घोषणा देण्यात आल्या.
इन्फो...
युवा शेतकरी तसे ज्येष्ठही...
शेतीविरोधातील या एल्गारमध्ये आदिवासी भागातील युवक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठदेखील सहभागी झाले आहेत.