कुकर्म करणाऱ्या नराधम पित्यास न्यायालयाकडून जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:17 PM2020-01-22T18:17:32+5:302020-01-22T18:22:39+5:30
सोळावर्षीय मुलीला धाक दाखवून आई व भावंडांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. बापाच्या धमकीमुळे पिडित मुलीने याबाबत कुठेही तक्रार केली नाही.
नाशिक : जन्मदात्या पित्याने पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत कुकर्म करत वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला कुमारी माता बनविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील एका नराधम शेतमजूराला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधा एस. नायर यांनी बलात्कार व पोस्कोच्या गुन्ह्यात दोषी धरले. त्याला न्यायालयाने बुधवारी (दि.२२) जन्मठेप व ३१ हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावाच्या शिवारात आपल्या कुटुंबासह तोरंगण येथून स्थलांतर करून हा नराधम बाब वास्तव्यास होता. त्याने आॅक्टोबर २०१५ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत पत्नी शेतावर मजुरीसाठी गेल्यानंतर सोळावर्षीय मुलीला धाक दाखवून आई व भावंडांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. बापाच्या धमकीमुळे पिडित मुलीने याबाबत कुठेही तक्रार केली नाही. त्यानंतर आरोपीने याचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केले. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. जिल्हा शासकीय रु ग्णालयात तिचे बाळंतपण करण्यात आले. पीडिता कुमारी माता असल्याची माहिती रु ग्णालय ्रप्रशासनाकडून सिन्नर पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तत्काळ रूग्णालय गाठले आणि पिडितेचा जबाब घेत तपासाला गती दिली. त्यानुसार आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण (पोस्को) व भारतीय दंड विधान कलम ३७६नुसार बलात्काराचा गुन्हा सिन्नर पोलिसांनी दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक तृप्ती आठवले यांनी तपास करु न पिडित ुमुलीच्या नराधम पित्यास बेड्या ठोकल्या. तसेच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. रेवती कोतवाल यांनी युक्तीवाद केला. जन्मास आलेले मुल व आरोपी पिडित मुलीचा नराधम बाप याचे डीएनए जुळल्याने आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने आरोपी पित्याला जन्मठेप व ३१ हजार रु पयांचा दंड ठोठावला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक नासीर सैय्यद, पोलीस शिपाई ज्योती उगले यांनी पाठपुरावा केला.