वाढदिवसाची पार्टी मागीतली म्हणून नाशकात दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 04:18 PM2019-03-14T16:18:30+5:302019-03-14T16:25:43+5:30
वाढदिवसाला बोलावले नाही अथवा पार्टी दिली नाही म्हणून रुसवे फुगवे होण्याचा अनुभव आपल्याचील प्रत्येकालाच नेहमी येतो. परंतु वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे त्याच्या वाढदिवसाची पाटी मागीतल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्याला चक्क मारहान केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नशिकमधील गंगापूर भागातील शिजीनगर परिसरात मंगळवारी (दि.१२) हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केले आहे.
नाशिक : वाढदिवसाला बोलावले नाही अथवा पार्टी दिली नाही म्हणून रुसवे फुगवे होण्याचा अनुभव आपल्याचील प्रत्येकालाच नेहमी येतो. परंतु वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे त्याच्या वाढदिवसाची पाटी मागीतल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्याला चक्क मारहान केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नशिकमधील गंगापूर भागातील शिजीनगर परिसरात मंगळवारी (दि.१२) हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा येथील अतुल बापूराव निकम (२४) व साक्षिदार गणेश सुधाकर क्षिरसागर (२०) शिवाजी नगरच्या भवर टॉवरसमोर उभे असताना तेथे संशयित आरोपी शिवाजी नगर येथील सौरभ अशोक यादव (२२) व सातपूकच्या अशोकनगर येथील सुभम अनिल कुमावत (२३) आले. यातील सौरभ यादवचा वाढदिवस असल्याने अतुल व गणेश यांनी सौरभकडे वाढदिवसाची पार्टी मागीतली. त्याकारणाने राग येऊन संशयीत आरोपीने शूभमच्या संगन्मताने कुरापत काढून अतूल व गणेश यांना शिविराळ केली. याचदरम्यान सौरभने त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने अतुलच्या छातीवर डोक्यावर मारून त्याला दुखापत केली. तर शूभम याने गणेश याला लाकडी दांड्याने डोक्यात मारून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याची धमकी देत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर सौरभ यादव यानेही अतूल व गणेश यांच्याविरोधात अशीच फिर्याद नोंदवली आहे. अतूल व गणेश यांनी वाढदिवसाची पार्टी मागीतली असता आपल्याकडे पैसे नससल्याचा सांगितल्याने त्याचा राग येऊन दोघांनीही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक टी. पी. पाळदे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. या प्रकरणी पोलिसांनी जिवे ठार मारण्याची धमकी व प्रयत्न तसेच शस्त्रबंधी आदेशाचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणात सौरभ याजव व शूभम कुमावत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक टी. पी. पाळदे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.