कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:52 PM2019-02-27T17:52:43+5:302019-02-27T17:53:14+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुसुमाग्रज यांच्या जन्म भूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुसुमाग्रज यांच्या जन्म भूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्र माची सुरु वात कुसुमाग्रज विद्यालयच्या विध्यार्थ्यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीत सादरीकरणाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे व कुसुमाग्रज यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. व सजवलेल्या पालखीची शिरवाडे वणी गावातून मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत कुसुमाग्रज विद्यालयातील विध्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मिरवणूकीनंतर महाविद्यालयात काव्यवाचनाचा कार्यक्र म घेण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक थोरात यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले. यावेळी पौर्णिमा साबळे, रोहित आहेर, कांचन जगताप या विद्यार्थ्यांनी मनोगत व कविता सादर केल्या.
कवी मुकुंद ताकाटे व गोटीराम हिरेकर यांनी भारतीय संस्कृती व भारतीय सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ कविता सादर करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. अशोक निफाडे व शरद काळे यांनी कुसुमाग्रजांचे कार्य व त्यांचे जीवन या विषयावर मनोगत व्यक्त केले तसेच शिक्षक हुजरे यांनी सूत्रसंचालन केले व रामदास कुशारे यांनी आभार मानले.
यावेळी कार्यक्र मासाठी गोविंद ठाकरे, शंकर थेटे, भास्कर निफाडे, शिवाजी निफाडे, पुंडलिक निफाडे, सुभाष निफाडे, वसंत निफाडे, संपत निफाडे, शंकर दिलीप काळे, रामराव निफाडे शिक्षक वृंद व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
चौकट....
शिरवाडे वणी ग्रामपंचायत येथे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी भाषा दिन साजरी करण्यात आली. यावेळी शामराव गायकवाड, शरद काळे, संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.