सातपूर परिसरात साध्या पद्धतीने जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:20 AM2020-12-30T04:20:03+5:302020-12-30T04:20:03+5:30
सातपूर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दत्ताचे प्रशस्त मंदिर उभारण्यात आले असून, दरवर्षी या मंदिरात सातपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावतीने ...
सातपूर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दत्ताचे प्रशस्त मंदिर उभारण्यात आले असून, दरवर्षी या मंदिरात सातपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. एक हजाराच्यावर नागरिक महाप्रसादाचा लाभ घेत असतात. या कार्यक्रमासाठी सहायक पोलीस आयुक्त,पोलीस उपायुक्त,पोलीस आयुक्त आवर्जून सहभागी होत असतात. तसेच सातपूर परिसरातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, अधिकारी यांसह सर्व थरातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो; परंतु यावर्षी कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रम रद्द करून केवळ श्री सत्यनारायण महापूजेचे साध्या पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी देवी मंदिरातील श्री दत्त मंदिरात दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. दिवसभर सातपूर कॉलनी पंचक्रोशीतील भाविक सहभागी होत असतात. यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने दत्त जयंतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. दत्त जयंती निमित्ताने केवळ अभिषेक करण्यात आला. कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्तांच्यावतीने करण्यात आले होते.