झाडांचा वाढदिवस साजरा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:17 AM2021-08-14T04:17:41+5:302021-08-14T04:17:41+5:30
------------------ पशुसंवर्धन मंत्र्यांची महिलांच्या शेळीपालक संस्थेला भेट सिन्नर : युवा मित्र संस्थेने स्थापन केलेल्या सिन्नर येथील महिलांच्या राज्यातील ...
------------------
पशुसंवर्धन मंत्र्यांची महिलांच्या शेळीपालक संस्थेला भेट
सिन्नर : युवा मित्र संस्थेने स्थापन केलेल्या सिन्नर येथील महिलांच्या राज्यातील पहिल्या सावित्रीबाई फुले शेळीपालक कंपनीला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली त्यांच्यासोबत आमदार माणिकराव कोकाटे उपस्थित होते. यावेळी आडवाडी येथील स्वाती गांजवे यांनी सांगितले. सविता इलग, गंगूबाई फोडसे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पशुसंवर्धन विभाग पुणेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे, डॉ. शशांक कांबळे, नाशिकचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. बी. नरोडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. डी. गर्जे, युवा मित्र संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
-----------------
वैभव नेह याचा सत्कार
सिन्नर : वैभव सतीश नेहे याची वयाच्या विसाव्या वर्षी मर्चंट नेव्हीमध्ये मर्चंट नेव्ही इंजिनिअर म्हणून युरोपमधील डेन्मार्क देशातील सहा देशांची ओनरशिप असलेल्या टॉर्म शिपिंग कंपनीमध्ये निवड झाली. पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी नेहे परिवाराला सिन्नर येथे सदिच्छा भेट वैभव नेहे याचा सत्कार केला. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, कामगार शिक्त फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार, कैलास खताले, डॉ. रामदास नाईकवाडी, डॉ. वैष्णवी नेहे, सतीश नेहे आदी उपस्थित होते.
---------------
संजय सानप यांचा वाजे विद्यालयात सत्कार
सिन्नर : येथील लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयात लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सानप यांचा मविप्रचे संचालक हेमंत वाजे, मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील कार्यकालात क्लबच्यावतीने विद्यार्थ्यांना भरघोस मदत करण्याची ग्वाही सानप यांनी दिली. यावेळी अभिनव बालविकासच्या मुख्याध्यापिका संगीता आव्हाड, उपमुख्याध्यापिका के. आर. रहाणे, एस. डी. गोर्डे, आर. एस. तुंगार, बी. एस. देशमुख यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
----------------------
विश्व वारकरी संघ जिल्हाध्यक्षपदी आव्हाड
सिन्नर : तालुक्यातील नि-हाळे-फत्तेपूर येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक हभप राजाराम महाराज आव्हाड यांची विश्व वारकरी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप जगन्नाथ महाराज देशमुख यांनी दिली. आव्हाड यांना शिक्षणाबरोबरच धार्मिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक कीर्तनकार तयार केले असून मुलांबरोबरीने मुलीही कीर्तनकार बनवल्या आहेत.