कोरोना काळात वाढदिवस; उपसरपंचावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:01+5:302021-07-21T04:12:01+5:30
येवला : कोरोना काळात वाढदिवस साजरा करत गर्दी जमविल्या प्रकरणी निमगाव मढ येथील उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येवला : कोरोना काळात वाढदिवस साजरा करत गर्दी जमविल्या प्रकरणी निमगाव मढ येथील उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यमान उपसरपंच नितीन लभडे यांनी २८ जून रोजी मारुती मंदिरासमोर वाढदिवस साजरा केला. त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत गैरकायदा मंडळी जमविल्याची तक्रार माजी सरपंच नवनाथ लभडे यांनी केली होती. तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी माहिती घेऊन येवला तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार निमगाव मढ येथील तलाठी तथा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थानिक अध्यक्ष दत्तात्रय गिरी यांनी तालुका पोलिसांत विद्यमान उपसरपंच नितीन लभडे व अन्य ६ व्यक्तींविरोधात फिर्याद दिली. तालुका पोलिसांनी या प्रकरणी प्रचलित कायदा कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.