मोकाट कुत्र्याचा महिलेला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:50 PM2018-10-13T23:50:15+5:302018-10-14T00:10:23+5:30
पिंपळगाव खांब जाधववाडी येथील विवाहिता ज्योती सुरेश शिरसाठ या शुक्रवारी दुपारी रिक्षा स्टॅन्ड जवळील शाळेत मुलीला घेण्यास जात होत्या. यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीतील एका कुत्र्याने ज्योती यांच्या डाव्या हाताला चावा घेऊन लचका तोडून गंभीर जखमी केले.
नाशिकरोड : पिंपळगाव खांब येथे मोकाट कुत्र्याच्या उपद्रवाने ग्रामस्थ त्रस्त झाले असून, मनपा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. पिंपळगाव खांब जाधववाडी येथील विवाहिता ज्योती सुरेश शिरसाठ या शुक्रवारी दुपारी रिक्षा स्टॅन्ड जवळील शाळेत मुलीला घेण्यास जात होत्या. यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीतील एका कुत्र्याने ज्योती यांच्या डाव्या हाताला चावा घेऊन लचका तोडून गंभीर जखमी केले. यावेळी उपस्थितांनी मोकाट कुत्र्यांना हुसकावून लावले. जखमी ज्योती यांची सुटका करून उपचाराकरिता बिटको रूग्णालयात दाखल केले.
पिंपळगावखांब भागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून ग्रामस्थ, महिला, लहान मुले घाबरून त्रस्त होऊन गेले आहेत. सायकलस्वार, दुचाकी चालक यांच्यामागे मोकाट कुत्रे लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासनाला व नगरसेवकांकडे तक्रार करून सुद्धा कोणीच लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. मोकाट कुत्र्याच्या त्रासातून ग्रामस्थांची सुटका करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीश पवार यांनी केली आहे.