बिटको, झाकीर हुसेनचे ऑक्सिजन प्लांट सज्ज; सिव्हीलसाठी अद्याप प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:03+5:302021-03-23T04:15:03+5:30
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नुकतेच नाशिक रोड येथील नूतन बिटको रुग्णालय आणि व्दारकानजीकचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय ...
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नुकतेच नाशिक रोड येथील नूतन बिटको रुग्णालय आणि व्दारकानजीकचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे अनुक्रमे १९ हजार लीटर आणि १३ हजार लीटर क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट सज्ज करण्यात आले आहेत. मात्र, जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटसाठी अद्यापही काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर ऑक्सिजनची उपलब्धता असलेले बेड कमी पडत होते. तसेच ऑक्सिजनचा पुरवठादेखील कमी होऊ लागल्याने अचानक रुग्ण वाढले तर काय, त्यामुळेच ऑक्सिजन प्लांट उभारणीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यात मनपाच्यावतीने नाशिक रोडला एक आणि नाशिक शहरात एक असे दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. जिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार असली, तरी ही प्रक्रिया मात्र अद्याप सुरुच आहे. त्यामुळे सिव्हीलच्या ऑक्सिजन प्लांटसाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर्सवरच काम चालवावे लागणार आहे.
फोटो
बिटको किंवा झाकीर हुसेन प्लांट
सूचना
ही बातमी कोरोना विशेष पानासाठी आहे.